मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी सध्या बेरोजगार. वारज्यापासून लक्ष्मी रोडपर्यंत आमचे कसे होणार, पुढे काय करायचे, पैशाची तंगी असले विषय सुरु. खरंतर सणासुदीच्या दिवशी रडू नये. वास्तुपुरुष, आसपासच्या शक्ती सतत हो म्हणत असतात असे ठसवलेले. पण त्या दिवशी काय कोण जाणे आम्ही दोघीही जरा वैतागलेल्याच होतो. सगळीकडे धडाधड इंटरव्यू देत होतो पण काहीतरी इचकत होते. म्हणून शेवटी मूड बदलायला बळेबळे काम काढून आम्ही गावात आलो होतो. तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती.मंडईच्या टोकापासून दगडूशेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ, केवडा, दूर्वा विकणाऱ्यांची दुतर्फा लाईन लागली होती. धडधाकट पुरुष, तरुण, मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन, हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते. ऊन मी म्हणत होते. आम्ही खाऊन पिऊन धड नाही जेवण धड नाही ब्रेकफास्ट अशा वेळी बाहेर पडलो होतो. पिशवीत पाण्याची बाटली असूनही काढणे शक्य नव्हते. फुल बाजारातल्या वाड्यांमधल्या दुकानात छोटे टेम्पो फुलांची पोती आणून टाकत होते. रस्त्याच्या दोन्ही कडांना नेहमीचे फुलवाले फुलांवर पाणी मारत होते. त्यांनी ताडपत्रीचे छत घातले होते. नेहमीच्या फुलविक्याकडे शिरलो. त्याच्याशी जरा गप्पा मारल्या. तीन चार दिवसांची फुले घेतली. यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती. फक्त कमळ आणि केवडा राहिले होते. समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते. 'कमळ कसे दिले?' 'वीस रुपये' कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बदली खाली ठेऊन एक मध्यमवयीन माणूस बोलत होता. पाच साडेपाच फूट उंची. उन्हाने पार रापलेला चेहरा. कष्टाची जात ओळखू येते खरंच असा. हाडंकाडे झाला होता. अ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कथा
, ललित
, अनुभव कथन
, मुक्तस्त्रोत
Rdesai
6 वर्षांपूर्वीछान लेख मनाला भावला.लोकांच्या भावना समजुन घेणे गरजेचे आहे .
ajaywadke
6 वर्षांपूर्वीफार फार छान लिहीलंय. वाचताना भरुन आलं..
किरण भिडे
6 वर्षांपूर्वीनक्की टाकू. whatsapp वरून लेख घेतलेला असल्यामुळे लेखकाचे नाव नव्हते त्यावर. आता कळले आहे तर नक्की टाकू.
प्राजक्ता काणेगावकर
6 वर्षांपूर्वीनमस्कार... माझ्या लेखाबरोबर माझं नाव पण टाकाल तर आवडेल मला
rakshedevendra
6 वर्षांपूर्वीहा लेख प्राजक्ता काणेगावकर यांनी लिहिलेला आहे व तो त्यांच्या मुखपुस्तिकेवर facebook वर त्यांनीच अवतरला आहे, तरी कृपया त्यांचे नाव लेखिका म्हणून देण्यास हरकत नसावी