अंक: सह्याद्रि ५, खंड- ३० ,नोव्हेंबर १९४९ लोककथा हा जुन्या अन् नव्या वाङ्मय-प्रकारांच्या मधला एक दुवा आहे. भारी रंजक अन् बहुतेक अगदी प्राचीन काळापासून सांगितले गेलेले व श्रद्धेने ऐकले गेलेले असे हे पहिले-पहिले बालवाङ्मय ठरेल! लेखनकला कधी अस्तित्वांत आली कुणास ठाऊक? पण लोकवाङ्मयाचा जन्म ‘लोकसंसारा’बरोबरच झाला व तो लेखनकलेच्या किती तरी आधी झाला एवढे निश्र्चित! एक दृष्टीनं लोककथा ह्या ‘श्रुति न् स्मृती’च्या सदरात जाऊन बसणाऱ्या गोष्टीच म्हणायच्या. ‘स्मृति न् श्रुती’ म्हणजे तरी काय? आठवलेल्या नी ऐकलेल्या वाङ्मयाचंच संकलन की नाही! आपल्याही लोककथा अशा ऐकीव अन् संस्मरणीय पद्धतीनं आजपर्यंत जीव धरून आहेत! उगीच नाही ‘आजीबाईंच्या गोष्टी’ ही पदवी मिळाली त्यांना! रचना कोणी केली? आताप्रमाणे लेखनकलेचा उत्कर्ष तेव्हा नव्हता. एक पुस्तक आता हजारोंच्या आवृत्तीने निघू शकते व ते दूरदूरच्या मुलुखांतल्या लोकांना सुलभतेने मिळू शकते. फार काय, आमच्या वेळेपेक्षाही आजचा बालवाचक भाग्यवानच म्हणायला हवा! कारण आम्ही लहानपणी, किती हुडकून वाचायची पुस्तकं जमवली, तरी केवळ बालवाङ्मयाची पुस्तकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मला मिळाली असतील! आतासारखी हरतऱ्हेची सुंदर, सचित्र, मोठ्या टाइपाची आणि सुबक पुस्तकं पाहून बालमित्रांचा हेवा वाटून मनात येतं की, आमच्या वेळी हे दालन असं समृद्ध असतं तर किती बहार झाली असती बरं! पण त्याहीपूर्वीची मुलं या बालवाङ्मयासाठी किती आसावलेली असतील? पुस्तकांची समृद्धी नाही तशी लेखकांचीही नव्हतीच. अन् त्या पहिल्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, सह्याद्री
, कथा
, दीर्घा
, साहित्य रसास्वाद
Sadhana Anand
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
Apjavkhedkar
6 वर्षांपूर्वीलेख उत्तम होता. अर्तात मालति दांडेकर सारख्या लेखिकेने लिहिलेला म्हणजे दुधात साखर. यांचे लेखन मला पहिल्यापासुनआवडतआलेआहे.