सांजवेळची स्वप्ने

पुनश्च    भानू काळे    2019-01-28 18:00:22   

अंक - अंतर्नाद, जानेवारी २०११ ऑगस्ट २००९च्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादहून एक पत्र हाती आले. उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव टाइप केलेले होते - सी.डी. देशमुख. ‘हे’ ‘ते’ नव्हेत याचे भान होतेच, पण तरीही पत्राने लक्ष वेधून घेतले. मे २००९च्या अंतर्नादमधील डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांचा ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... एक मुक्त चिंतन’ हा लेख खूप आवडल्याचे पत्रात सुरुवातीलाच लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचे-समाजसेवकांचे-राजकारण्यांचे स्वत:ला आलेले कटू अनुभव विशद केले होते. ते लिहिता लिहिताच स्वत:ची जीवनकहाणीही देशमुखांनी मांडली होती. स्वत:ची कौटुंबिक पार्श्वभूमी, ब्रुक बॉंड या चहाच्या कंपनीत भारी पगारावर केलेली विक्री-अधिकाऱ्याची नोकरी, नंतर ती सोडून अनंत भालेरावंच्या ‘मराठवाडा’ दैनिकात विनावेतन केलेले काम, ‘मराठवाडा’ का बंद पडले याची कारणमीमांसा, नंतर केलेले प्लॉटविक्री-शेती-अभ्यासिका इत्यादी व्यवसाय, त्यांत मिळवलेले उज्ज्वल आर्थिक यश, प्रभाकर झरकर या बालमित्राने दिलेल्या भेटवर्गणीमुळे अंतर्नाद मासिकाशी झालेला परिचय, आणि आता वयाची पंच्याहत्तरी उलटल्यावर साहित्यक्षेत्रात काहीतरी करायची तीव्र इच्छा या सगळ्याची विस्तृत माहिती त्या आठ पानी टंकलिखित पण अत्यंत प्रांजळपणे लिहिलेल्या पत्रात होती. अशी पत्रे एकूण दुर्मिळच. साहजिकच देशमखुांविषयी एक आदरमिश्रित आपुलकी मनात निर्माण झाली आणि नंतरच्या प्रत्येक प्रत्यक्ष भेटीत ती दृढावत गेली. त्या सर्वच भेटींचा तपशील देत बसत नाही, पण त्या सगळ्यातून साकारलेल्या एका अभिनव योजनेविषयी लिहायला हवे. उपरोक्त पत्रानंतर देशमुख साताऱ्याला दाभोळकरांकडे एक दिवसाच्या मुक्कामासाठी गेले. (दाभोळकरांच्या बंगल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , अनुभव कथन , साहित्य जगत

प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    ग्रेट माणूस !!!!

  2. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला .

  3. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    लेख अतिशय अंतर्मुख करतो. अशी समाज सेवा करणारी जेष्ठ मंडळी पाहिली की व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतात. त्यांचे हे सर्वस्व वाहून केलेले काम बघून खरंच त्यांना माझे लक्ष लक्ष प्रणाम. वर्षाची सुरवात फ़ारच सकस लेखानी झाली. धन्यवाद.

  4. hpkher

      6 वर्षांपूर्वी

    अशीच माणसे आपली कला, संस्कृती जातं करतात.

  5. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    मूळ ऑंगस्ट २००९ चा अंकातील लेख व आवाहन आणि त्या वयातील श्री देशमुख यांची जिद्द केवळ अप्रतिम आहे. मलाही त्या योजनेचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले. सातही पुस्तके वाचून झाली पण प्रतिक्रिया देण्याचे काही कौटुंबिक धावपळीत राहूनच गेले.पण पैसे मिळाल्यावर श्रीयुत देशमुख यांचा फोन आला होता व मुंबईत येईन तेव्हा जरूर भेटू असा संवाद ही झाला होता.पण तेही राहून गेले. त्या योजनेतील जे स्पिरीट होते त्याची आठवण या लेखाने झाली .धन्यवाद.

  6. arya

      6 वर्षांपूर्वी

    व्वा ! अत्यंत प्रेरक ..मार्गदर्शक लेख ...

  7. Namrata

      6 वर्षांपूर्वी

    किती अप्रतिम लेख आहे. शीर्षक देखील अगदीच साजेसे. देशमुख काकांच्या कार्याला सलाम???



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts