'विवाहसमस्या' सोडविताना...

पुनश्च    वसंत काणे    2019-04-13 06:00:58   

अंक : रोहिणी - फेब्रुवारी १९५९ लेखाबद्दल थोडेसे : मासिकातील एक सदर, वाचकांसाठीचा एक उपक्रम म्हणून 'रोहिणी' या मासिकाने १९५९ साली विवाहेच्छुक तरूण- तरूणींचे परिचय प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि  पुढे या कल्पनेचा एवढा विस्तार झाला की तीच या मासिकाची ओळख बनली. त्यातून मोठा व्यवसाय जन्माला आला आणि इतर अनेकांनीही त्यात प्रवेश केला.  एखादे मासिक काय चमत्कार करु शकते, एखाद्या अभिनव कल्पनेतून  मोठा सामाजिक व्यवसाय कसा उभा राहू शकतो याचा धडाच 'रोहिणी' चे संपादक वसंत काणे यांनी साठ वर्षांपूर्वी घालून दिला होता. त्याची सुरूवात कशी झाली ते सांगणारा हा लेख. ज्या काळी 'विवाहाची खटपट' हा अत्यंत खाजगी मामला होता, ज्या काळी मुलीच्या लग्नासाठी 'जोडे झिजवणे' एकट्या बापानेच करावे अशी प्रथा होती, त्या काळात सुयोग्य वर-वधू संशोधनाचा विषय सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयोग  काणे यांनी केला, हे विशेष. हे परिचयाचे सदर  सुरु करताना त्यांनी वाचकांसाठी लिहिलेली भूमिका, अर्थात सदराचे संपादकीय,  त्या संपादकीय लेखाला वाचकांनी पत्रे पाठवून दिलेला प्रतिसाद आणि अगदी सुरुवातीला मासिकाकडे  आलेले विवाहेच्छुकांचे परिचय, हे सगळे आज एकत्र वाचताना लक्षात येते, आपल्या समाजाने किती मोठा प्रवास केला आहे. रोहिणी, फेब्रुवारी १९५९ या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** 'रोहिणी' ची संपादकीय भूमिका सामाजिक जीवनांत ज्या कांही समस्या माणसास भेडसावीत असतात त्यांत विवाहसमस्या एक आहे. इतर अनेक प्रश्र्न असे असतात की त्यांतून मार्ग निघण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी यश येतेच असे नाही. आर्थिक धोंड त् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , रोहिणी

प्रतिक्रिया

  1. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    एका खूप चांगल्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल संपादकाची स्पष्ट भुमिका स्पृहणीय आहे . छोटी सुरुवात असलेला हा उपक्रम उत्तरोत्तर वाढतच गेला आणि त्याचा अनेक लोकांना फायदा झाला . दूरदृष्टी बद्दल श्री काणे ह्यांचे अभिनंदन .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts