सागराच्या सान्निध्यात


खडकवासल्याच्या केंद्रीय जल व विद्युत केंद्रातून अविनाश फणसळकर मुख्य संशोधन अधिकारी या पदावरून बारा-तेरा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांनी लिहिलेल्या सुबोध शास्त्रीय लेखांचा निसर्गावर मात हा संग्रह प्रसिद्ध आहे. तुलनेने अल्पपरिचित अशा जीवनक्षेत्रातील त्यांचे हे काही अनुभव. ********** स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सर्वसाधारण मुलांच्याप्रमाणे मीही सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी धरली. पण लवकरच बांधकाम क्षेत्र कंटाळवाणे वाटू लागले. विटा, वाळू, सिमेंट यांच्याशीच कायमचा संबंध! शिवाय या क्षेत्रातील आर्थिक व्यवहार हे सरळ माणसाला कधीच पचनी पडणार नाहीत, असे असतात. शेवटी कंटाळा येऊन हे क्षेत्र सोडले. शिक्षणाचाही उपयोग होईल, पण त्याचबरोबर ज्या क्षेत्रात जीव रमेल असे अगदी वेगळे, चाकोरीबाहेरचे जलशास्त्रीय संशोधनाचे (मूलभूत संशोधनापेक्षा उपयोजित संशोधनाचे) क्षेत्र निवडले. त्यातही मुख्यतः समुद्रतटीय अभियांत्रिकी क्षेत्राला उपयोगी पडणारे संशोधन करावयाचे होते. समुद्रकिनाऱ्यावर बंदरे बांधली जातात. काही समुद्रकिनाऱ्यांची झीज होत असते, तर काही ठिकाणी वाळू साचत राहते. अधूनमधून वादळे किनाऱ्यावर येऊन धडकतात. त्यामुळे नुकसान होते. धक्क्याला लागलेली बोट डचमळू नये म्हणून बंदरात लाटांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मोठ्या बोटींना पाण्याची खोलीपण खूप लागते. बंदरापाशी तेवढी खोली नसेल, तर त्या खोलीचा चर खणावा लागतो. त्यात गाळ साठण्याचा संभव असतो... अशा अनेक समस्या असतात. या समस्यांवर उपाय शोधणे म्हणजे उपयोजित जलशास्त्रीय संशोधन. हे प्रश्न निर्माण होण्यास काही निसर्गनिर्मित, तर काही मानवनिर्मित कारणे असतात. निसर्गनिर्मित कारणे म्हणजे लाटा, भरती, ओहोटी, वादळे, पाण्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , दीर्घा , अविनाश फणसळकर

प्रतिक्रिया

  1. Anantkapse

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर अनुभवलेखन.

  2. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    छान नवीन अनुभव.

  3. rambhide

      6 वर्षांपूर्वी

    चाकोरीबद्ध स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये जीवन व्यतीत करण्याचा धोपटमार्ग नाकारून जगलेल्या एका वेगळ्या जीवनाची शब्दबद्ध झलक!! वाचनीय, समुद्राच्या पाण्याइतकेच ओघवते!

  4. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    out of box मस्त



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts