मत कोणाला देणार? पक्षाचा उमेदवार, की स्वतंत्र उमेदवार?

पुनश्च    गो. वि. देशमुख    2019-04-06 06:00:28   

भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ साली झाली  परंतु देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्थानिकांकडे प्रशासन सोपवण्यााची प्रक्रिया सुरू झाली होती.  १९३७ साली ११ प्रांतांमध्ये  प्रांतिक निवडणुका  झाल्या आणि सात प्रांतात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. म्हणजे १९५१ साली आपली राजकीय संस्कृती चांगली पंधरा वर्षे जुनी झाली होती. त्या पंधरा वर्षात राजकीय नेत्यांची प्रतिमा  काय तयार झाली होती? काँग्रेसचेच तेव्हाचे म्हणजे १९५१ मधले माजी आमदार डॉ देशमुख प्रस्तुत लेखात म्हणतात,'पक्षांतील उमेदवाराला  मोठा फायदा म्हणजे बुद्धी नसली तरी  चालते हा होय; किंबहुना बुद्धी असणे हा मोठा तोटाच आहे. यामुळे बुद्धीमान माणसे पक्षांत जायचा संभव कमी व पक्षालाही बुद्धीवान् उमेदवाराला पक्षांत घेण्याची उत्कंठा नसते! उमेदवारांची चढाओढ, तो किती वेळां तुरुंगांत गेला, त्याच्यावरच बसलेली आहे! जितक्या जास्त वेळा तो तुरुंगांत गेला असेल, तेवढा उमेदवारांच्या निवडणुकींत त्याचा नंबर वर व निवडणुकीचा हक्क जास्त, अशी परिस्थिती पक्षांत झाली आहे.' राजकीय पक्षांऐवजी स्वतंत्र उमेदवारांना मत द्यावे असे आवाहन करताना लेखकाने या लेखात जे काही लिहिले आहे ते  वाचताना आपण २०१९ सालात लिहिलेला लेख वाचतो आहोत की काय असेच वाटत राहते.. ********** दिवाळीच्या सणाची वेळ करंज्या खाण्याची आहे. त्याप्रमाणेच फटाके उडविण्याचीही आहे. दिवाळीत खर्च करण्याची हौस असते. मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वह्या-चोपड्याही पुजल्या जातात. दिवाळीत भाऊबहिणी वगैरे प्रेमाची माणसे घरी गोळा करण्यांत आनंद वाटतो, या दिवाळीत, कायदेमंडळामध्ये प्रतिनिधी धाडण्याचा आपणाला विचार करावा लागेल. त्यामुळे या दिवळीला जास्तच महत्त्व आहे. इकडे, सगळीकडे नसलेल्या विज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , पुनश्च , विविध वृत्त , गो. वि. देशमुख

प्रतिक्रिया

  1. ulhas

      6 वर्षांपूर्वी

    लेख अगदी ताजा टवटवीत आहे. जणू सद्य परिस्थितीला उद्देशून लिहीला आहे.१९५१ ते २०१९ परिस्थिती जैसे थे.

  2.   6 वर्षांपूर्वी

    Perfect! The things continue as if history repeats!!!!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts