दि. १०.३.१९ प्रति, चि.सौ.का. पिंकीस, तुला पिंकी म्हटलेलं आवडत नाही, हे मला माहित आहे. काय करणार तू माझ्या डोळ्यासमोर येते ती फ्रॉक घालून भातुकली खेळणारीच. मुलं कितीही मोठी झाली तरी नावाचं हे टोपण काही निघत नाही. मूळ नाव टोपणाखाली इतकं झाकलं जातं की ते आठवतच नाही. पूर्वी नवसानं झालेल्या अपत्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला तिरस्करणीय विचित्र नावं ठेवली जात, जसे दगड्या, धोंड्या ,धोंडाबाई, कचऱ्या, केराबाई ही टोपणनावच पुढं काळाच्या ओघात पिंट्या आणि पिंकी झाले आणि टोपण नावाची परंपरा चालू राहिली. परंपरेचा एक अदृश्य चिवट धागा माणसासोबत असतोच. कितीही मोठा झाले तरी आपल्या मुलांना टोपण नावाने किमान खाजगीत हाका मारायची देखील परंपराच. या परंपरेचा एक पाईक म्हणून तू माझ्यासाठी पिंकीच्! खरं म्हणजे आताही घडलं ते या परंपरेच्या धाग्याशीच. तंत्रज्ञानाच्या जबरदस्त धक्क्यात खरंतर काळ दुप्पट तिप्पट वेगाने पळतोय, त्यामुळे आपल्यातलं अंतरही वाढतय. अंतर किती तर गंगेच्या या तीराला मी तर त्या तीराला तू. मधली गंगा स्वच्छ झालीये हेही प्रतिकात्मकच. दोन टोकावर आपण असूनही आज आपला संवाद होतोय. तू मला काका म्हणून मान देतेस अन् मला तुझ्याबद्दल पुतणी म्हणून ममत्व वाटतय. हीही परंपरेची देणगी. कुठलाही आडपडदा न ठेवता निर्भयपणे तू आपल्या आवडलेल्या जोडीदाराची निवड जाहीर केलीस आणि हा जोडीदार परजातीतला आहे, याचीही स्पष्ट कल्पना दिलीस. ही निर्भयता मात्र तुझ्या काळाची देणगी.तुझी बाजू तू तुझ्या बाबांना , त्यांच्या भावना व जेष्ठत्वाचा आदर राखत पटवून दिलीस. ह्यात तुला बहुविध.कॉमवरच्या सल्ल्याचाही उपयोग झाला हे तू आर्वजून सांगीतलस.काहीही असो शेवट गोड झाला! प्रेम लाभणं हे भाग्याचं, ही कल्पना पूर् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .