अंक – अलका, दीपावली खास अंक पुणे रेडिओ केन्द्राच्या प्रारंभीच्या दिवसांतली गोष्ट. दिल्लीहून ब्रॉडकास्टिंग विभागांतील एक बडे अधिकारी आले होते व लोकांच्या अपेक्षा व सूचना कळाव्या म्हणून पुण्यांतील रेडिओशी संबद्ध अशा पंधरावीस प्रमुख मंडळींना विचारविनिमयाकरतां बोलावून घेतलं होतं. सर्वसामान्य माहितीची देवाणघेवाण झाल्यावर रोडिओवरील मराठी भाषेकडे बोलणं वळलं. या विषयावर मी बऱ्याच वेळा लिहिलं असलेलं ठाऊक असल्यानं, आलेल्या मंडळींपैकी एका प्रसिद्ध गृहस्थांनी मला हटकलं. “अहो! आतां बोला ना! तुम्ही लिहितां ना यासंबंधी अनेकदां?” अनेकदा तोंडी आणि लेखी सूचना करून माझ्यांत एक प्रकारची “विफलते”ची भावना आली होती. तथापी तोंड न उघडण्याचं कारण सांगण्याकरतां तरी तोंड उघडावंच लागणार होतं! म्हणून मी म्हटलं. “मी अनेकदा लिहिलं आहे; रेडिओ अधिकाऱ्यांच्या सौजन्यशील इच्छेवरून त्यांच्याशी अनेकदां समक्ष बोललोंही आहे. पण आतां मला त्याचा फारसा उपयोग आहेसं वाटत नाही.” माझा निराशेचा सूर ऐकून दिल्लीहून आलेल्या बड्या अधिकाऱ्यांना थोडं आश्र्चर्य वाटलं. त्यांनी खोदून विचारल्यामुळं कांहीच बोललं नाही तर वाईट दिसेल, म्हणून मी रेडिओवरील बातम्यांतील भाषेचा आणि उच्चारपद्धतीचा उल्लेख केला. त्यावर कांही मंडळींनी मामुली चिरपरिचित खुलासे केले. “मूळ इंग्रजी बातमीचं भाषान्तर शब्दशः करणं जरूर असतं, नाहीतर राजकीय घटनेचा किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या उद्गारांचा विपर्यास केल्यासारखं होईल.” तसंच “बातमी रेडिओवर वाचतांना ती शक्य तितकी विकारशून्यतेनं (कलर लेसली) वाचणं जरूर असतं; नाहीतर त्यांत वाचणाऱ्या रेडिओ नोकरींचे रागलोभ मिसळल्यासारखं होईल” इ.इ. “पण इतक्यांतूनही कांही दोष सर्वसामान्य असे ठरण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीदिरंगाईसाठी क्षमस्व. यापुढे नक्की काळजी घेऊ. आणि आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद!
arvindpbv
6 वर्षांपूर्वीलेख चांगलाच आहे, पण या लेखातील बरेच मुद्दे हा लेख (आणि इतर अनेक असेच लेख) बहुविध वर पुनःप्रकाशित होताना शुद्ध-लेखनाच्या इतक्या अपरिमित चुका का असतात त्यालाही लागू पडू शकतील. किती चुका ?
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीआताची “चॅनलीय” मराठी भाषा तर ऐकवत नाही. नवीनच शब्द शोधतात.. उदा. “बघुयात”, “पाहूयात”. “भाषा” चा उच्चार “भाशा” असा करणं समजू शकतो. ऱ्हस्व व दीर्घ शब्दांचे उच्चार नीट न करणं देखील ठीक आहे. ( नशीब “दूरदर्शन” ला “दुर्दर्शन” नाही म्हणत) पण “जनता” शब्द तर हमखास “जन्ता” असा उच्चारला जातो.. त्यापुढे गृह किंवा हृदय हे शब्द उच्चारायला फारच प्रॉब्लेमटिक आहेत. इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेले अॅन्कर आणि रिपोर्टर असल्यावर दुसरं काय होणार..