विनोद आणि अश्लीलता

पुनश्च    प्र. के. अत्रे    2019-07-26 19:00:41   

अंक – जनवाणी दीपावली विशेषांक, १९६० विनोद आणि अश्लीलता ह्यांच्या मर्यादा काय? माधवराव जोशी, गडकरी आणि कोल्हटकर यांच्या कोट्या अश्र्लील या सदरांत मोडतात का?.... जो विनोद स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजांत निःसंकोचपणे वाचता येत नाही तो अश्र्लील- *** विनोद आणि अश्र्लीलता ह्यांच्या मर्यादा काय? हा प्रश्न महाराष्ट्रांत नेहेमी उपस्थित केला जातो. अश्लील ह्या शब्दाचा अर्थ मी येथे ‘ग्राम्य’ एवढाच घेतो. कायद्याने ‘Obscene’ गोष्टी लिहिणे किंवा दर्शविणे हा गुन्हा ठरविलेला आहे. त्या इंग्रजी शब्दाचे भाषांतर सर्व साधारणपणे ‘अश्लील’ असेच करण्यात येते. त्या अर्थाने वाङ्मयाच्या चर्चेत ‘अश्लील’ हा शब्द वापरला जात नाही. स्त्री पुरुषांची शरीरे आणि त्यांचे नैतिक संबंध हा अशिक्षित आणि असंस्कृत समाजांत हास्याचा नि विनोदाचा विषय समजला जातो. किंवा चार चांगले सुशिक्षित पुरुष जमले म्हणजे आपापसांत त्यांचा जो खाजगी हास्यविनोद चालोत तो अशाच स्वरूपाचा असतो. इंग्लंडसारख्या सुसंस्कृत देशातही भोजनानंतरच्या वार्तालापांत इंग्रज पुरुष अशा तऱ्हेच्या लैंगिक (smutty) गोष्टी सांगून मनोविनोदन करतात. तथापी, ह्या विनोदाला समाजांत किंवा साहित्यांत प्रकट स्थान नसते. अशा तऱ्हेच्या विनोदाला ग्राम्य आणि असभ्य म्हणजेच ‘अश्लील’ समजले जाते. वाङ्मयीन अश्लील शब्दाची अगदी सोपी व्याख्या करावयाची झाल्यास असे म्हणता येईल की, ज्या विनोदांत प्रकट वा अप्रकटरीत्या काही तरी लैंगिक सूचना असेल त्याय विनोदाला अश्लील म्हणावयास हर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , अवांतर , जनवाणी

प्रतिक्रिया

  1. ghanshyampawar11@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    लेख पूर्ण वाटत नाही.

  2. Santosh

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर

  3. Abhay Sonar

      6 वर्षांपूर्वी

    Please send it on mail

  4. Sangram

      6 वर्षांपूर्वी

    Nice

  5. Shobha dere

      6 वर्षांपूर्वी

    छान, उपक्रम



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts