दीप-शिखा मॅनेजर्स

पुनश्च    शरु रांगणेकर    2019-07-26 10:00:24   

अंकः अंतर्नाद – फेब्रुवारी २००५ श्री. शरु रांगणेकर हे राष्ट्रीय पातळीवर नामांकित असलेले एक व्यवस्थापन-तज्ज्ञ आहेत. ‘In the Wonderland of Indian Managers’ आणि ‘In the World of Corporate Managers’ ही त्यांची पुस्तके ‘मॅनेजमेंट क्लासिक्स’ मानली जातात. त्यांतील पहिल्याचा श्री. किशोर आरसकृत मराठी अनुवादही गाजलेला आहे. श्री. रांगणेकर यांच्या काही मराठी कथा पूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. प्रस्तुत लेखाचे अनुवादकार श्री. अ. पां. देशपांडे ‘नोसिल’ या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक होते. सध्या ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत. ********** व्यवस्थापन क्षेत्रात असे काही मॅनेजर्स पाहायला मिळतात, की त्यांना ‘दीप-शिखा’ मॅनेजर्स म्हणावेसे वाटते. कालिदासाने ‘दीप-शिखा’ ही उपमा दिली आहे. कालिदासाच्या उपमा प्रसिद्ध असल्यामुळे ‘उपमा कालिदासस्य’ असा वाक्प्रचार मराठी आणि संस्कृतमध्ये रूढ झाला आहे. एका उपमेत त्याला ‘दीप-शिखा कालिदास’ असे म्हटले आहे. रघुवंशात इंदुमतीच्या स्वयंवराच्या निमित्ताने कालिदासाने ही उपमा वापरली आहे. इंदुमती वरसंशोधन करीत होती. अनेक राजे ओळीने बसले होते आणि इंदुमती वरमाला घेऊन एकेका राजाच्या पुढून जात होती. घनदाट अंधःकारात मशाल पुढे पुढे जावी तशी इंदुमती जात होती. मशाल जवळ यावी आणि आजूबाजूचा भाग उजळला जावा असे होत असे. मशाल पुढे गेली, की आधी उजळलेला भाग अंधःकारात बुडून जात असे, त्याप्रमाणे इंदुमती एखाद्या राजाजवळ गेली, की राजा उजळून दिसायचा. ती पुढे गेली की राजा काळवंडायचा. कालिदासाने म्हटले आहे, संचारिणी दीपशिखेव रात्रौ यम् यम् व्यतिताय पतिवरा सा। नरेंद्र मारगाट्ट एव प्रपेदे विवर्णभावम् स स भूमिपालः।। काही मॅनेजर्स असे असतात, की ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , दीर्घा , अनुभव कथन , व्यवस्थापन

प्रतिक्रिया

  1. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    दीप शिका मॅनेजर हा शारु रांगणेकर यांचा मूळ इंग्रजी लेख अ पां देशपांडे यांनी अनुवादित केलेला आहे त्याचं नुकतच वाचन मी केलेल आहे दीप शिखा ही उपमा प्रथमतः कालिदासाने वापरलेली आहे त्याचा अर्थ असा की नववधू वरमाला घेऊन आपल्या वराच्या शोधात जंव्हा जाते तेव्हा ती एखादी मशाली सारखी दिसते तिच्या वराच्या राजाच्या समोर जाते तेव्हा त्याचा चेहरा उजळून निघतो परंतु ती पुढे निघून गेल्यावर पुन्हा त्या राजाचा चेहरा काळवंडून जातो त्याला कालिदासाला दीपशिखा असे म्हटलेले आहे अर्थात ही उपमा लेखकाने कार्य कौशल्याच्या अनुषंगाने वापरले आहे लेखक असं म्हणतो कंपनीचा मॅनेजर चांगला असतो त्या कंपनीची भरभराट होते किंवा त्या संस्थेची भरभराट होते त्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक ध्येयनिष्ठा दोन कृतिशीलता आणि तीनस्वामीनिष्ठा त्यासाठी लेखक एक उदाहरण देतो की औषध निर्माण कंपनीमध्ये मॅनेजर आपल्या कामगाराला सांगतो तु इथे रोज जे काम करणार आहेस ते फार महत्त्वाचे काम आहे जगणे आणि मरणे यातील फरक म्हणजे धूळीचा कण . उत्पादन विभागातील धूळ तेथे घडणाऱ्या प्रत्येक पातळ औषधात गोळ्यात इंजेक्शनच्या बाटलीत जाणार आहे असे औषध घेणारा रुग्ण मरणार त्यामुळे अशा वातावरणात एकही धुळीचा कण राहणार नाही हे पाहणे तुझे काम आहे त्यामुळे तो कामगार आपली जबाबदारी ओळखून काम करतो याउलट सरकारी कार्यालयात साहेब शिपायाला बोलावून घेतो आणि सांगतो तुझे काम चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याचे आहे येथे या कार्यालयातील सगळ्यात खालच्या दर्जाचे असे हे काम आहे झाडूवाला विचार करतो ते एखाद्या एवढ्या खालच्या दर्जाचे आहे तर ते मन लावून कशाला करायचे असा हा फरक आहे आणि त्यावर ध्येय निश्चित होते म्हणून प्रत्येकाला तुझे काम फार महत्वाचे आहे उच्चश्रेणीचे आहे हे आपण पटवून दिले पाहिजे आपण काहीतरी भव्यदिव्य करीत आहोत असं करणाऱ्याला वाटलं पाहिजे . कृतिशील ते बद्दल लेखक म्हणतो आज करे सो कल कर कल करे सो परसो जल्दी जल्दी क्या पडी है जब जीना है बरसो असं करून चालत नाही तर त्वरित ची दखल आपण त्वरित घेतली पाहिजे कृतिशील तेचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे बाजारामध्ये एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे वन मिनिट मॅनेजर या पुस्तकांमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या पहिली गोष्ट मॅनेजरला आपले उद्दिष्ट एका मिनिटात सांगता आले पाहिजे मॅनेजरने हाताखालच्या माणसाचे कौतुक एका मिनिटात केले पाहिजे आणि उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर त्याची खरडपट्टी एका मिनिटात काढली पाहिजे सारांश जर तुम्हाला कृतीशील बनायचे असेल तर छोटे उद्दिष्ट दिले पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे ' संभालकर पाव रखते है कमर बलकाती जाती है आखे जब चार होती है मोहब्बत हो ही जाती है नजाकत तजनिनो के बनाने से नही बनती खुदा जब हुस्न देता है नजाकत आ ही जाती है थोडक्यात पैशाच्या मागे लागू नका तर आयुष्यामध्ये या तीन गोष्टींच्या मागे लागा यश तुम्हाला मिळेलच .

  2. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख. रांगणेकर यांचे कार्पोरेट मनेजर ह्या पुस्तकाचा पण अनुवाद झाला आहे.आणि अतिशय वाचनीय आहे. भाषा तर अगदी हलकी फुलकी आहे..चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts