लोकगीतांच्या शोधात

पुनश्च    अज्ञात    2019-09-20 10:00:30   

अंक – आवाज – दीपावली १९५७ टिळक स्मारक मंदिरापुढून जात असताना मला गाण्याचा आवाज ऐकू आला. थांबलो. आवाज गोड, धाटणी चांगली वाटली. दरवाजाजवळ तिकिटमाम्या दिसला नाही. या गावात गाण्याचा कार्यक्रम काय वाईट! आत शिरलो, बसले अन फसलो. कार्यक्रम गाण्याचा नव्हता, कथाकथनाचा होता. विषय ‘लोकगीते’ होता. व्याख्यान देणाऱ्या बाई पाच मिनिटे भाषण, की एक लोकगीताचा नमुना, मग पुन्हा भाषण, या पद्धतीने, जुन्या संगीत नाटकांत्या नायिकेप्रमाणे टप्प्याटप्प्याने, बोलत व गात आणि गात व बोलत होत्या. त्यांचा अभ्यास खूप दिसला. त्या रंगल्या होत्या, जिव्हाळ्याने बोलत होत्या. मीही रंगलो. बाईंचे नाव सरोजिनी बाबर होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलझाडीतून, घराझोपड्यांतून शेकडो वर्षांपूर्वीच्या अनामिक कविकवयित्रींनी लिहिलेले लोकगीतांचे बहुमोल भांडार विखुरलेले आहे. सानेगुरुजी, दुर्गा भागवत, महादेवशास्त्री जोशी, मालती दांडेकर, बोरसे प्रभृति आदी साहित्यसेवकांनी हिंडून व कष्ट घेऊन हजारो लोकगीतांचे संशोधन केले. नंतर त्यांचे संपादन करून त्यांनी पुस्तके छापली, मराठी भाषेतले एक उपेक्षित दालन समृद्ध केले. अजूनही हजारो लोकगीते खेडवळ व जंगली स्त्रीपुरुषांच्या नरड्यात अडकून पडली आहेत. त्यांचे उत्खनन होणे जरूर आहे. उत्साही व तरुण साहित्यिकांनी खेड्यातून व जंगलातून हिंडून, गोडीगुलाबीने बोलून, प्रसंगी पदराला खार लावून, काळाच्या अंधारात विरून जाणारी ही लोकगीते प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांची ही सेवा शारदादेवींच्या दरबारात रूजू होईल. असा त्या व्याख्यानाचा आशय होता. व्याख्यान संपल्यावर घरी जात असताना माझ्या डोक्यात तेच विचार घोळत होते. कॉलेजमध्ये असताना म

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीर्घा , आवाज , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      6 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला.जंगलात रहाणार्या जमातीची माहीती रंजक आहे.धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts