नमो युद्धायः

पुनश्च    द. श्री. मराठे    2019-11-16 06:00:32   

आपल्याला दुसऱ्या कोणाचे काही नको असले तरी इतरांना आपल्या ताब्यातील प्रदेश पाहिजे असला तर त्याच्या रक्षणाकरिता आपण लढावयाचे की नाही? हा प्रश्न आपल्यासमोर चीनने १९६२ साली आणि पाकिस्तानने १९६५ साली टाकला. दोन्ही वेळी जागतिक शांतता की राष्ट्रीय हित ह्यांत जास्त मौल्यवान कशाला समजायचे? हा प्रश्न आपल्यापुढे पडला आणि दोन्ही वेळेला राष्ट्रीय हित हे जास्त महत्त्वाचे असे आपण ठरविले.... शांतता आणि सौहार्द  टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही केवळ एका देशाची नसते, ती दोन्ही बाजूंनी पार पाडायची असते. पण तसे न घडल्यानेच जगभर युद्धे सुरु राहतात. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर लिहिलेला हा लेख आहे. एप्रिल ते सप्टेंबर १९६५ या दरम्यान भारत-पाक युद्ध झाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेला. दत्तात्रय श्रीधर मराठे (१३ फेब्रुवारी १९०६ - ३ डिसेंबर१९९२) हे जागतिक राजकारणाचे गाढे अभ्यासक. ‘जगाचा इतिहास’, ‘भारत-पाक युद्धविचार’, ‘भारताचे शेजारी’, ‘अमेरिकन काँग्रेस’, ‘चीनच्या प्रचंड भिंतीमागे’ ही मराठे यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत. ********** दीपावली डिसेंबर १९६५ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा इतर राष्ट्रांशी जो संघर्ष झाला त्याचे आपल्या राष्ट्रावर काय परिणाम झाले असे जर कोणी विचारले तर सर्वसामान्यतः एक उत्तर मिळते आणि ते म्हणजे असे की, जग आपण समजत होतो तसे नाही. आणि आपले काही तरी चुकते आहे याची जाणीव आम्हाला झाली. नक्की काय चुकते हे मात्र कळत नाही. काय चुकते आणि काय बिघडते याची जाणीव झाली की, पूर्वी ज्या गोष्टी मह्त्त्वाच्या वाटत होत्या त्या मग महत्त्वाच्या वाटेनाश्या होतात. हल्लीच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे जीवनातील जुनी मुल्यें ढांसळू लागली आहेत आणि नवी मुल्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , दीपावली

प्रतिक्रिया

  1. benodekarabhinav@yahoo.com

      5 वर्षांपूर्वी

    अजूनही संजय राऊत विदुषकाप्रमाणे पंचशीलचा जप करताहेत ,म्हणजे हे 55 वर्षे आधी लोकांना समजलेली गोष्ट आजही स्वार्थापायी ते नाकारत आहेत .अर्थात भारतीय एव्हढे बावळट राहिले नाहीत हे वेगळे !

  2. rohitbhide90

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख

  3. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    कृपया ९१५२२५५२३५ या क्रमांकावर संपर्क साधा.

  4.   6 वर्षांपूर्वी

    सर आम्ही याआधी 100 रु भरून सभासदत्व मिळविले आहे.

  5. Vineett

      6 वर्षांपूर्वी

    I get similar problem sometimes. Workaround is to refresh the page (Use browser refresh or reload button or right click and click reload) after logging in. Bahuvidh should fix this issue.

  6. nandu

      6 वर्षांपूर्वी

    In spite of being member, i don't get to read the full article. Why it happens so ? After logging, only the initial part of article appears on the screen with the remark click here to read the full article .Please suggest if i am making any mistake in logging. Anand Nawathe



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts