श्रीपु भागवत, मौज आणि सत्यकथा यावर खूप लिहून, वाचून झाले आहे. परंतु प्रस्तुत लेखात दिसणारे श्रीपु फार क्वचित कुणाला दिसले असतील. आपण वाचलेले बहुतांश लेख 'श्रीपु भक्ती' किंवा 'श्रीपु आदर' या भावनेतून लिहिले गेलेले होते. मौज, दिवाळी २००८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख मात्र श्रीपुंचा शेजार, जिव्हाळा आणि माया लाभलेल्या लता काटदरे यांनी त्या स्नेहातून लिहिलेला आहे. यात साहित्यिक डोकावतात ते केवळ श्रीपुंच्या घरी येण्यापुरते. बाकी सर्व लेख भरुन उरतात ते 'कौटुंबिक श्रीपु' जे आपल्याला फार माहितीच नाहीत. लता काटदरे यांच्या लेखणीतली सहजता आणि घटना सांगताना कोणताही आव न आणता, शब्दांचा फुलोरा न सजवता सांगण्याची शैली यामुळे हा संबंध लेख म्हणजे जणू एक भावनिक चित्रपट झाला आहे. ********** अंक – मौज दिवाळी २००८ भागवत मंगळवारी गेले. ते हॉस्पिटलमधून रविवारीच घरी परतले होते. लगेच सोमवारी सकाळी मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा मला पाहून ते प्रसन्न हसले. गप्पांच्या ओघात ते म्हणाले, “मला आता खूपच बरं वाटतंय. पण हे घर मात्र मला खूप वेगळं, काहीसं परकं वाटतंय. माझंसं वाटत नाही.” मी मनातून चरकले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्याच मी मंगेश पाडगावकरांना फोन केला. त्यांना म्हटलं, “काल मी श्रीपुंकडे जाऊन आले. त्यांचं काही आता खरं नाही, असं वाटतंय. मन अगदी उदास झालंय. तुम्ही याल का संध्याकाळी आमच्या घरी?” त्यावर ते म्हणाले, “आज नको, उद्या येतो.” हे बोलणं झालं, त्या संध्याकाळीच श्रीपु गेले. दिवेलागणी झाल्यावर श्रीपुंची काळजी घेणाऱ्या शुभाताईंचा घाबऱ्या घाबऱ्या आवाजात फोन आला. “लगेच या, आजोबा पाहा कसंसंच करताहेत...” त्यांच्या स्वरातूनच मी काय ते समजले, मी आणि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मौज
, व्यक्तिविशेष
, अनुभव कथन
किरण भिडे
5 वर्षांपूर्वीआपल्याला आवडलेले लेख कृपया इतरांबरोबर शेअर करा. जेणेकरून चांगले साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचेल...
Gayatrimahurkar@yahoo.co.in
5 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर लेख. खूप दिवसांनी चांगल,सशक्त वाचन अनुभव मिळाला. काही देव माणसांचा सहवास आपल्याला लाभतो. तो समजणे आणि सयंमितपणे शब्दात उतरवणे.. यासाठी जी संवेदनशिलता हवी, ती पूर्णपणे जमली आहे. श्रीपु आणि विमलताई यांचे वैयक्तिक , कौटुंबिक सहजीवन
Vinayappa
5 वर्षांपूर्वीअप्रतिम
anaghaavahalkar@gmail.com
5 वर्षांपूर्वीThank you for such a nice article
gondyaaalare
5 वर्षांपूर्वीअनुभव पूर्णपणे वैयक्तिक असूनही खूप भावले . आपल्या घरातलीच वरिष्ठ व प्रिय व्यक्ती गेल्या नंतर उमाळून आठवणी येत रहाव्यात तसं लताताईंना झालं असणार आणि हा लेख त्याचा परिपाक वाटतो . शाळेत असताना मी श्रीपुंना प्रा न र फाटक ह्यांच्या कडे आलेलं पाहीलं आहे . अत्यंत सुसंस्कृत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व .
Rahulmuli
5 वर्षांपूर्वीफार दिवसांनी काहीतरी विलक्षण अनुभव देणारं वाचायला मिळालं. आम्ही सामान्य माणसं पण यात अद्वैत, श्रीपु व विमलताई यांचा सारखंच नातं आम्ही दोघे व आमच्या शेजारच्या युवराज वय वर्ष ४ अनुभवत आहोत म्हणुन लेख अत्यंत जवळचा वाटला.
s2borwankar
5 वर्षांपूर्वीलेख अप्रतिम सुंदर आहे. मी माझ्या बालपणी अकोल्याला श्री पु भागवत यांना माझ्या आजोबांच्या घरी ते उतरले होते तेव्हा पाहिल होत. समवेत विद्या बाळ पण होत्या. त्या ही आता नाहीत. मी काय शिकतोय वगैरे जुजबी चौकशी दोघांनीही सहज गप्पा करत केली मला छंद कोणता तर मी म्हणालो वाचन. यावर दोघांनीही प्रसन्नता व्यक्त केली. अरे वा काय वाचतोय सध्या विचारल. त्या नकळत्या वयातही ही कुणी वेगळी अन मोठी माणसे आहेत हे मला जाणवलं होता. आता मजजवळ फक्त बालपणीची एक चांगली आठवण उरलीय.
carvindan@yahoo.com
5 वर्षांपूर्वीएकाच वेळी विविध भावनांचा कल्लोळ झाला आहे मनात. अप्रतिम! सलाम लताताईंना - अक्षरशः चित्रपट पाहत असल्याची अनुभूती आली.
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीभारावून गेलो..
purnanand
5 वर्षांपूर्वीखूप सुंदर लेख.श्रीपु यांचे कौटुंबिक भावबंध छान उलगडून दाखवले आहेत.भागवतांचा सहवास लाभला ही भाग्यची बाब आहे.
shripad
5 वर्षांपूर्वीसुरेख!