माणूस ज्या भूप्रदेशात राहतो त्यात त्याचे मन आणि मानस कायम गुंतलेले असते. मातीला माता म्हणतात तेही त्यामुळेच. आपल्या प्रदेशाची अस्मिता, ओळख कायम राहावी, प्रगती व्हावी याचा ध्यास माणसे सतत घेतात आणि त्यात अडचणी येत असतील तर त्यातून स्वतंत्र होण्याची आंदोलने सुरु होतात. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला साठ वर्षे होत आली आहेत, तरीही विदर्भातून अजूनही अशा आंदोलनांच्या हाका अधून मधून येत असतात, त्याची कारणे इतिहासात दडलेली आहेत. ती समजून घेताना विदर्भाचा इतिहासही समजून घेतला पाहिजे, वऱ्हाड आणि उर्वरित विदर्भ कसे वेगळे आहेत हेही तपासून पाहिले पाहिजे. विविध भूप्रदेशांच्या इतिहासाच्या वाटा पुसत जाणाऱ्या ‘स्थललेख’ मालिकेतील हा लेख आहे. यातून विदर्भाचा गतकाल, सांस्कृतिक ऐश्वर्य आणि भौगोलिक स्वभाववैशिष्ट्यांचा अतिशय रंजक परिचय होतो. ‘चित्रमय जगत’च्या जानेवारी १९५७ च्या अंकात हा लेख प्रथम प्रसिद्ध झाला होता. म्हणजे तेंव्हा हा भूप्रदेश, १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आलेल्या मराठी व गुजराती भाषिकांच्या विशाल द्वैभाषिक राज्याचा भाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा गजर तेंव्हा हवेत दुमदुमत होता. अंक – चित्रमयजगत – जानेवारी १९५७ ********** प्राचीन थोर वारसा भुज ते भंडारा आणि कांडला ते कुलाबा ह्या विशाल द्विभाषिक मुंबई राज्यांत विदर्भ हा एक महत्त्वाचा घटक आहे. विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा व यवतमाळ हे वऱ्हाडचे चार जिल्हे आणि नागपूर, चांदा, वर्धा व भंडारा हे चार जिल्हे असे एकूण आठ जिल्हे समाविष्ट झालेले आहेत. ह्या सर्वांचे क्षेत्रफळ ३७,००० चौ.मैल असून ह्या प्रदेशाची लोकसंख्या ७६ लक्ष इतकी आहे. ह्यांपैकी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
5 वर्षांपूर्वीसंघाचे द्वितीय सरसंघचालकांचे नाव `गोळवलकर' हवे, ते चुकून `गोवळकर' पडले आहे.
gondyaaalare
5 वर्षांपूर्वीस्वतंत्र महाराष्ट्राचा अविभाज्य प्रमुख भाग आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळूनही दुर्दैवाने साठ वर्षानंतर आजही विदर्भाची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही . कदाचित् राजकीय व औद्योगिक नेतृत्व कमी पडत असावे . फडणवीस फार सज्जन होते , मुंबई - पुण्याच्या लोकांशी सामना करायला नितीनजी हवेत .