'यशंवत'चे पहिले संपादकीय निवेदन (१९२८)


अंक : यशवंत, डिसेंबर १९२८ मासिके सुरु होणे आणि ती बंद पडणे हा मराठीच काय जगातील सर्वच भाषांमधील एक परिपाठ आहे. भारतात तर शेकडो भाषा असल्याने आजवर हजारो मासिके अल्पकाळ ते दीर्घकाळ चालून बंद पडलेली आहेत. त्यातली अनेक हौशी होती, तर उत्तम दर्जाची परंतु व्यावहारिक कारणांनी बंद पडलेलीही अनेक आहेत. मराठी भाषेतही अशा मासिकांची संख्या उदंड आहे, ‘यशवंत’ हे १९२८ साली सुरु झालेले आणि पुढे लवकरच बंद पडलेले असेच एक मासिक. गणेश महादेव वीरकर (जन्म १८८८, मृत्यू २४ मे १९७४) यांनी ते सुरु केले होते. ‘गणेश महादेव वीरकर आणि कंपनी’ स्थापन करुन त्यांनी ७५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्यात नाथमाधव यांच्या कादंबऱ्या, सरदेसाई यांच्या रियासतीचे सर्व भाग अशी महत्त्वाची  पुस्तके- ग्रंथ होते. यशवंत, भूमिजन अशी नियतकालिके त्यांनी उत्साहाने सुरु केली, परंतु त्यात यश न आल्याने १९४० साली ते या व्यवसायातून बाहेर पडले. कोणतेही मासिक सुरु करताना संपादकांना यशाची खात्री असते आणि आपण जो मजकूर देणार आहोत त्याच्या दर्जाबद्दलही विश्वास असतो. प्रस्तुतचा लेख हा ‘यशवंत’  मासिकाचे पहिले संपादकीय होय. उत्साह आणि अपेक्षा त्यातून ओसंडून वाहताना  दिसतात.. सर्व सत्यसंकल्प पूर्ण करणाऱ्या परमेश्र्वराच्या चरणी आमची नम्र प्रार्थना आहे की त्याने आम्हाला यश द्यावे. महाराष्ट्र भाषेला अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य व माधुर्य आणणाऱ्या शब्दसृष्टीच्या ईश्र्वरांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की आमच्या या कार्याला त्यांचा आशीर्वाद असावा. मराठ्यांच्या देशाला प्रत्यक्ष परमेश्र्वरानेही दिले नाही एवढे वैभव आमच्या नावाला आणण्यासाठी हिंदुस्थानच्या प्रत्येक रणभूमीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या यशवन्त वीरांच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यशवंत , भाषा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts