अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ आपल्याकडे पुष्कळ घरांतून श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय. काही युरोपियन ग्रंथांतून ऑर्म नांवाच्या इतिहासकाराने दिलेले आणि युरोपांतून मिळविलेले श्रीशिवाजीराजांचे चित्र प्रमाण धरून आणि त्या चित्रांतील चेहऱ्याची ठेवण जुळती ठेवून, आपल्या कल्पनेची भर घालून चित्रे तयार करून प्रसुत केली आहेत. पुढे श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राकडे लक्ष अधिकाधिक लागत गेले. त्यांच्याविषयींची भक्ती वाढत गेली तशी छत्रपतींची अनेक चित्रे लोकांपुढे आली. श्रीशिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र चित्रमय करून छापण्याची कल्पना मनांत आल्यावर स्वतः चित्रकार असलेले देशभक्त राजसाहेब बाळासाहेब औंधकर प्रतिनिधी यांनी तसा प्रयत्न केल्याचे प्रसिद्ध आहे. अर्थात चेहऱ्याची ठेवण सोडून दिली तरी सर्व चित्रे काल्पनिक आहेत. अलीकडे शिवाजीमहाराजांचे पुतळे जागजागी उभारण्यांत येत आहेत. त्यांची तैलचित्रेही लावण्यांत येत आहेत. यापुढे चित्रकार आणि मूर्तिकार यांना शिवाजीच्या खऱ्या विश्र्वसनीय चित्राची आणि वर्णनाची गरज पडते व कित्येक चोखंदळ कलावन्त त्यासंबंधाने माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीतात. तथापि, त्या सर्वांचीच पोंच विश्र्वसनीय साधनांपावेतो होतेच असे नाही. साधने विश्र्वसनीय कोणती आणि अविश्र्वसनीय कोणती याचा बारकावा त्यांना सहाजिकच अवगत नसतो आणि त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान याचाही विवेक त्यांच्याकडून होत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
hemant.a.marathe@gmail.com
5 वर्षांपूर्वीप्रस्तुत लेखामध्ये शिवाजी असा उल्लेख कुठेही खटकत नाही कारण राजा हा रयतेचा असतो व रयतेला तो आपल्या घरातीलच वाटतो. आम्ही लहानपणी शिवाजी म्हणतो हा खेळ खेळत असू, तेव्हा आम्ही काही त्यांचा अपमान करत नव्हतो. त्याकाळी ती पध्दत होती, तेव्हा उगीच मूळ लेखात बदल करून त्यात विसंगती आणणे योग्य ठरणार नाही
ratnakarkulkarni
5 वर्षांपूर्वीआई ला आपण एकेरी उल्लेख करतो म्हणून अनादर होत नाही. उगीचच कोणत्याही गोष्टी भावनिक बनवू नयेत. शाळेत शिवाजी राजाविषयी सर्व उल्लेख एकेरी आहेत पण त्यामुळे अवमान होतोय अस वाटलं नाही.
सुधन्वा कुलकर्णी
5 वर्षांपूर्वीमूळ लेखांत कुठलेही बदल न करता आपण ते प्रसिद्ध करीत असतो. सेतू माधवराव पगडी ते गोविंद पानसरे असे अनेक जुने लेखक आणि इतिहासकार महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरीत करतात, त्यात त्यांचा उपमर्द करणे हा हेतू असूच शकत नाही. जसे विठ्ठलाला प्रेमाने एकेरीने संबोधले जाते तसेच महाराजांनाही. त्यामुळे आपण वाचकांनीही त्यात गैर मानून घेण्याचे कारण नाही. कोल्हापूरची ' शिवाजी ' युनिव्हर्सिटी किंवा मुंबईचे 'शिवाजी' पार्क, यात महाराज असा आदरार्थी उल्लेख नसल्याने आजवर शिवाजी महाराजांचा कधी अपमान झाला नाही. तर या लेखाने कसा होईल ?
ajitbmunj
5 वर्षांपूर्वीशिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खूप खटकतो, तो काढून "शिवाजी महाराज" असा आदरार्थी उल्लेख करुंन लेख पुन्हा प्रसिद्ध करा.