अंक : रोहिणी, जुलै १९५१ नावात काय आहे, असं शेक्सपिअर एकदा लिहून गेला, त्यानंतर या वाक्याचा आधार घेऊन नाममहात्म्यावर आजवर शेकडो लेख आले असतील. या वाक्याला वेठीला धरुन विनोद करण्याची परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळानुसार विनोदाची जातकुळी बदलते, परंतु शेक्सपिअरच्या वाक्याचं उदाहरण कायम राहतं. हा लेख वाचून आपल्याला पन्नासच्या दशकातील सर्वसामान्य विनोदाच्या जातकुळीचा एक मसला मिळतो. पण या लेखाची आणखी एक गंमत आहे. १९५१ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या या लेखात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रातील शब्दकोड्यांचा आणि ते सोडवून मिळणाऱ्या बक्षिसाचा उल्लेख आहे. शब्दकोडे तेंव्हा नुकतेच सुरु झाले होते, ते पूर्णपणे बरोबर सोडविणाऱ्यांना रोख बक्षिसेही दिली जात. मुख्य म्हणजे लोकसत्तामध्ये या कोड्यांची जबाबदारी तेंव्हा जयवंतराव साळगावकर यांच्याकडे होती. या शब्दकोड्याच्या यशातूनच त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला आणि त्यातून पुढे ‘कालनिर्णय’चा उद्योग उभा राहिला... ********** शेक्सपिअर कितीही उत्कृष्ट नाटककार वा कवी असला व मानसशास्त्र जाणणारा कुशल कलावन्त म्हणून त्याला मानले तरीही नावाचं मानसशास्त्र त्याला समजलं नव्हतं असंच मी म्हणेन. नाहीतर ‘नावांत काय आहे?’ असं त्यानं म्हटलंच नसतं. रविवार असल्याने चहापाणी आटोपून ‘रविवारच्या लोकसत्तेची’ वाट पाहत ओटीवरच्या बाकावर बसलो होतो. त्या दिवशी आमच्या लॉटरीचा निकाल होता. लोकसत्तेतील कोडे सोडवून पाठविले होते व त्याच्या निकालाकडे डोळे लावून बसलो होतो. आजकाल महागाई दामदुपटीने वाढत आहे व त्या मानाने मिळकत वाढत नाही. तेव्हा जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याकरीता जादा पैसा कसा मिळेल ही विवंच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
maxianton64@gmail.com
5 वर्षांपूर्वीछान
sugandhadeodhar
5 वर्षांपूर्वी"नावात काय आहे?" अजरामर सुभाषित!
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीहलका फुलका लेख आहे .
Kantilal-Oswal
5 वर्षांपूर्वीछान...
smmohite.hr@outlook.com
5 वर्षांपूर्वीसुंदर लेख आहे