अंक - प्रसाद, मे १९७३ लेखाबाबत थोडेसे : आपल्यापैकी बाबासाहेब पुरंदरे याचं 'शिवछत्रपती' वाचलं नाही असे वाचक क्वचितच असतील. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वर्णन केलेल्या देवगिरी साम्राज्य आणि त्याचा राजा रामदेवराय याच्याबद्दल माझ्या मनात कायमच कुतूहल राहिलं. एवढं मोठं साम्राज्य, सेना असताना तो अल्लाउद्दीन खिलजीच्या केवळ काही हजार फौजेपुढे हरला. हा खरचं हैराण करणार वास्तव आहे. या पराभवामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा इतिहासच बदलून गेला. तोपर्यंत परकीय सत्तेच्या जोखडापासून काही प्रमाणात मुक्त असलेला दक्षिण भारत सुलतानशाहीच्या अधिपत्याखाली आला. साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृती यांच्या वैभवशिखरावर असलेले हे साम्राज्य एखादी वावटळ यावी असे नष्ट झाले. यामागची कारणमीमांसा प्रस्तुत लेखामध्ये संदर्भांसह परखडपणे मांडली. 'प्रसाद' मासिकाच्या मे १९७३ च्या अंकात आलेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... देवगिरीकर यादव हे महाराष्ट्राचे अखेरचे सम्राट होते. या साम्राज्याबद्दल दोन गोष्टींचे आश्चर्य इतिहासात कायमचे राहून गेले आहे. एक म्हणजे देवगिरीचे प्रचंड वैभव व दुसरे म्हणजे रामदेवाच्या कारकीर्दीत अल्लाउद्दीनच्या लहानशा मुसलमान सेनेने केलेल्या पराभवामुळे या साम्राज्याचे झालेले खेदजनक पतन. विशेषत: रामदेवराव यादव ही व्यक्ती इतिहासात कायमचेच कुतूहल होऊन राहिलेली आहे. देवगिरीचा किल्ला मध्ययुगीन किल्ल्यांचा एक उत्कृष्ट नमुना व भारतातील एक अजिंक्य किल्ला समजला जातो. वेढा घालून हा किल्ला क्वचितच जिंकला गेला. यादवाच्या घराण्यात महादेव यादवाने यादवांच्या सत्तेचा बराच विस्तार केला.हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव
पुनश्च
प्र ल सासवडकर
2017-12-13 06:00:32
वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
नम्र मते आणि प्रामाणिक मतभेद
वसंत फेणे | 3 महिन्यांपूर्वी
मतें कितीहि नम्र किंवा विनम्र असली तरी तीं जबरदस्त मजबूत असतात.
पुनश्च
डॉ. श्री. व्यं. केतकर - उत्तरार्ध
रा. भि. जोशी | 3 महिन्यांपूर्वी
गांधींची एका वर्षात स्वराज्य मिळविण्याची कल्पना ज्यांना हास्यास्पद वाटे
पुनश्च
डॉ. श्री. व्यं. केतकर - पूर्वार्ध
रा. भि. जोशी | 3 महिन्यांपूर्वी
डॉक्टरांच्या कादंबर्यांवर ललितकृतींची कसोटी लावून बरीच टीका करण्यांत आली
पुनश्च
आत्मा विकणे आहे
कमल देसाई | 3 महिन्यांपूर्वी
सैतान झालो तरी मलाही काही नीती आहे.
पुनश्च















Harihar sarang
5 वर्षांपूर्वीमुसलमानांच्या आक्रमणाचा धोका न ओळखू शकणारा हा राजा चतुर्वर्गचिंतामणी हा व्रतवैकल्यांना अति महत्त्व देणाऱ्या ग्रंथाच्या रचनाकार अशा हेमाद्री पंडिताला राज्याचा प्रधानमंत्री करतो। राज्यप्राप्तीसाठी धोक्याने आमनदेवाचे डोळे काढतो। हेमाद्री पंडितांच्या चिथावणीने चक्रधर स्वामींच्या हत्येची आज्ञा देतो। भारतीय इतिहासाला अत्यंत अनिष्ट वळण देणाऱ्या या राज्याची ज्ञानेश्वरकृत स्तुती हा केवळ प्रथेचा भाग असावा। लेख एकंदर माहितीपूर्ण। विस्तृत माहितीसाठी ब्रह्मानंद देशपांडे लिखित देवगिरीचे यादव हा ग्रंथ पहावा।
विनय सामंत
9 वर्षांपूर्वीहा संलग्न इतिहास वाचून पहा : देवगिरीचे यादव राजांच्या कारकिर्दीत देवशर्म्याच्या वंशात "मांगल" (माइंग किंवा मांग किंवा माइंदेव किंवा मलिनाथ) नामक महापराक्रमी पुत्राचा (देवशर्माचा पणतू) जन्म झाला. सुरुवातीस माइंदेव ह्याने यादव राजांच्या सैन्याचे काही लढाइत नेतृत्व केले. माइंदेवाच्या नेतृत्वाखाली यादव सेनेने सौराष्ट्र (काठेवाडातील राजे), यदुवंशीय लाट (गुजराथेकडील यादव) त्याहूनही प्रबळ तिलिंग गौड (तेलंगणातील गौडदेशी), हम्मीर, द्रविडदेशाचे राजे (होयसळ बल्लाळ), आणि पांडिनाथ राजे (मदुरा अथवा उच्चंगीदुर्ग येथील पांडय संस्थानिक) यांचा धुव्वा उडवून यादव साम्राज्याचा विस्तार केला. ह्यानंतर त्याने यादवांच्या कोकण-गोवा (कदंब) साम्राज्याचा "सेनापती" म्हणून जबाबदारी सांभाळली. ह्या दरम्यान त्याने कदंबवंशीय राजांचे राज्य बारा वर्षापर्यंत आक्रमण करून जिंकणा-या, वसलेल्या गुप्त राजांचे पूर्ण उच्चाटन केले. माइंदेवाने सिंघण यादव राजांचा महाप्रधान, सर्वाधिकारी, महापरमविश्वासी अशी बिरूदे संपादन केली. महापराक्रमी व सत्वशील असणा-या माइंदेवाने मूळ राजसत्तेशी प्रमाणिक रहात विजयादित्याचा मुलगा श्रीमत्रिभुवनमल्ल यास लहानपणीच राज्याभिषेक करून त्याजवरील प्रेमाने सबंध राष्ट्राचे पालन केले व विश्वस्त म्हणून राज्यकारभार केला. पण सन १२२० च्या दरम्यान त्रिभुवनमल्ल कदंबानंतर कदंब-राजवेल खूंटली व संपूर्ण 'कदंब राज्य' माइंदेवाच्या स्वतंत्र अधिपत्याखाली आले व तो मंगमहिपती बनला. माइंदेवाना "सामंतकुल यशोभानु: मांगलाख्य महेश्वर:" अशी स्वातंत्र्य व पराक्रम निदर्शक उपाधि मिळाली. आद्य गौड ब्राह्मणांच्या सामंत घराण्याची स्वतंत्र राजसत्ता स्थापना करणारा हाच तो महापराक्रमी राजा मंगमहिपती! त्याची मूळ राजधानी "कुडुवलपत्तन" म्हणजे कुडाळदेश! https://kdagb.in/samant-rajvansh
shubhada.bapat
9 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण
mugdhabhide
9 वर्षांपूर्वीaajahi maharashtra ashach rajakiy matabhedancha shikar aahe asech mhanave lagel.