अर्थसंस्कार- कर्ज

पुनश्च    उदय कर्वे    2017-12-09 06:00:45   

लेखाबाबत थोडेसे : 'अर्थकारण' या सदरात सीए उदय कर्वे यांच्या 'अर्थसाक्षरता' मालिकेतला दुसरा लेख समाविष्ट केला आहे. आरोग्यसंस्कार मासिकातील ही मालिका त्यावेळी खूप वाचकांना पसंद पडली होती. या लेखात कर्वेसरांनी 'कर्ज' या विषयाचा त्यांच्या टिपिकल 'पुणेरी' कर्वे शैलीत समाचार घेतला आहे. कर्ज ही संकल्पना सोप्या तऱ्हेने उलगडून सांगत असता यातील जोखीम थोडक्यात व मुद्देसुदपणे मांडली आहे. आरोग्यसंस्कार अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... पैसे भाड्याने घेणे (कर्ज काढणे) आजकालच्या काळात ”लोन” असा शब्द टाइप करून इंटरनेटवर ”सर्च” चा हुकूम दिला तर असंख्य बँका, पतपेढ्या, बिगर बँकिंग पतसंस्था, खाजगी मालकीच्या कंपन्या यांची पानेच्या पाने भरून माहिती येते. आणि त्यानंतर तुम्हांला अनेक इमेल्स येणं सुरू होतं, जणू तुम्हांला कर्ज देण्यासाठी सारं विश्‍व आतुर झाले आहे. वर्तमानपत्रातही कर्ज देणार्‍या खाजगी कंपन्यांच्या आक्रमक जाहिराती असतात ज्यात आम्ही किती दिवसांत, नव्हे किती तासांत कर्ज वितरण करतो हे सांगितलेले असते. त्यात टोल फ्री फोन नंबर, अमुक शब्द अमुक मोबाईल वर फक्त एस्. एम्. एस् करा.  ”मिस्ड कॉल” द्या. अशी अनेक प्रेमळ आवाहने असतात. अशा आक्रमक जाहिरातींचे विचित्र परिणाम आपणां सर्वांवर होत असतात. माझ्या सी. ए. च्या व्यवसायातील एक बर्‍यापैकी ”कॅश रीच” व खुपसा प्रामाणिक अशील (क्‍लायंट) एकदा निरनिराळ्या बँका व फायनान्स कंपन्यांकडून उपलब्ध असलेल्या ”कारलोन्स्” च्या तपशिलाचा एक तक्ताच करून घेऊन आला व म्हणाला ”जरा बघून घ्या, व उद्यापर्यंत सांगा यांपैकी कोणाकडून नवीन कारसाठी कर्ज घेऊ.” मी ते सर्व बघितले,  त्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्यसंस्कार , अर्थकारण

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      7 वर्षांपूर्वी

    अर्थसंस्कार-कर्ज हा लेख गेल्या वर्षीचा(९ डिसेंबर २०१७) असल्याने तुमच्या चालू वार्षिक वर्गणीत तुम्हाला तो वाचता येत नाहीये.

  2. mkkelkar

      7 वर्षांपूर्वी

    वर्गणी भरली आहे, तरी सुद्धा लॉगिन करून, हा लेख पूर्ण वाचता येत नाहीये

  3. VijayGokhale

      7 वर्षांपूर्वी

    छान.

  4. Patharkar Satish

      8 वर्षांपूर्वी

    Realy

  5. prashasnt

      8 वर्षांपूर्वी

    Good

  6. avthite

      8 वर्षांपूर्वी

    Very insightful..



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts