(काल (शनिवारी)'अनुभव कथन 'सदरात प्रसिद्ध झालेल्या माथेरान -भाग १ या लेखाचा उत्तरार्ध) अंक – भारतसेवक, जानेवारी १९१६ या ‘मॉलेट स्प्रिंग’ शिवाय आणखीही दोन झरे आहेत. त्यांची नांवे ‘शारलेट लेक’ व ‘सिमसन टँक’ अशी आहेत. पहिल्यावर स्नानाची व धुण्याची उत्तम सोय आहे. येथील देखावाही फार मनोहर आहे. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळचा देखावा फारच रमणीय असतो. येथून समुद्राची खाडीही थोड्या अंतरावर दिसते. सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेच्या मुखावरील आरक्तता, निसर्गाची शांतता, खालच्या बाजूने हिरवेगार गवत, आणि निर्मळ पाणी, ही ज्याच्या नशिबी पाहण्याची असतात, तो खरोखर धन्य होय. ही तेथील वनश्री माझ्या स्मरणांतून केव्हांही जाणे शक्य नाही. एकीकडे ताठ्याने उभी असलेली टेंकडी, डाव्या बाजूला ‘डेंजर पॉइंटचा’ स्वर्गांतील वर्णन केल्याप्रमाणे उंच उंच चढत गेलेला सुंदर नागमोडी रस्ता, त्याला लागूनच पिशाच्चनाथाचं उघडें देवस्थान, त्याच्या आसपासची गर्द झाडी, तिच्यांतूनच गेलेली एक लहानशी पाऊलवाट, आणि उजव्या बाजूला धरण ओलांडून गेल्यानंतर बाजाराकडे जाणाच्या रस्ता, त्याच्या पाठीमागे तलाव, त्याच्या पाण्यावरील लहरीबरोबर उत्पन्न होणारे त्यांतील जलतरंग, असा तो एकंदर देखावा केवळ अवर्णनीय होय. ज्याप्रमाणे एखादी सुंदर व सुकुमार कुमारिका आपल्या बाललीलांनी पहिल्याने वात्सल्य उत्पन्न करते, त्याचप्रमाणे हुबेहूब माथेरानच्या सृष्टिसौंदर्याची गोष्ट आहे. कारण त्या सौंदर्यातही बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थांचा समावेश झालेला जागजागी दृष्टीस पडतो. पूर्वीची ऋषिमंडळी खरोखरच मोठी रसिक असली पाहिजे. त्यांचे पवित्र आचरण, गंभीर विचार, सात्विक भाव, या सर्वांचे कारण जर कोणते असेल, तर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
                                            
                                                
                                                    स्थललेख
                                                
                                            
                                                
                                                    , अनुभव कथन
                                                
                                            
                                                
                                                    , प्रवास वर्णन
                                                
                                            
                                                
                                                    , भारतसेवक
                                                
                                            
                                            
                                            
                                                
                                                    
                                                
                                            
                                        

 
                                
                                    


















 
		 
                 
                 and then add to homescreen
 and then add to homescreen
rajandaga
6 वर्षांपूर्वीV good
mailimaye@gmail.com
6 वर्षांपूर्वीAtishay Sundar lekha!!!!