अंक : हेटकरी, जुलै १९४९ लेखाबद्दल थोडेसे: आपल्या समाजाची एक गंमतच आहे. अनेकदा आपण एखादी समस्या, एखादा प्रश्न यांची विशिष्ट कालखंडाशी सांगड घालायला जातो, कालांतराने आपल्या लक्षात येते की या समस्येचा विशिष्ट कालखंडाशी संदर्भ जोडणे चूक आहे. उदाहरणार्थ पुनश्चवरील जुने म्हणजे अगदी सत्तर-ऐंशी वर्षापूर्वीचे लेख वाचताना त्यात अनेकदा मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी काळजी व्यक्त केलेली आढळते. आपण आजही त्याच सूरांत बोलत असतो मराठी विषयी. मुले-मुली हल्ली करिअरचा विचार करतात, त्यात लग्नाचं वय निघून जातं, ते उशीरा लग्न करतात, स्त्रीला आता पुरुषांवर विसंबून राहणे मंजूर नाही...असा तक्रारीचा सूर आजच्या काळातलाच असेल ना? तर नाही, तब्बल सत्तर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या लेखात ही तक्रार करण्यात आलेली आहे. काळ बदलतो, प्रश्न तेच राहतात. प्रश्न सांगण्याची भाषा मात्र बदलते, या लेखातील भाषेलाही त्या काळाचा गंध आहे...छान वाटते वाचताना. हेटकरी, जुलै १९४९ या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** मानवी जीवनांत विवाहविधीने मानाचे स्थान पटकाविले आहे. सुसंस्कृत मानवाने आपल्या बुद्धीबलाने व आत्मबलाने आद्ययावत सुसंस्कृत जीवन मूल्ये हस्तगत केली आहेत. पूर्वी बाल्यावस्थेत असणाऱ्या मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनाला व संस्कृतीला आदर्श असे आजचे सुस्वरूप दिले आहे. सोने भट्टीत तावून खुलवून नंतर त्याचे सुंदर असे कलापूर्ण दागदागीने बनवितात. हिऱ्याला कलापूर्ण पैलू पाडल्यावर त्याची किंमत व मूल्य वाढते. तसेच सुबुद्ध सुविद्य मानवाने जीवनांला व स्वतःला साहित्य, विद्या, कलाशिक्षण यांनी संस्कारीत केले आहे व जीवनधारणेसाठी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mahesh Mohare
4 वर्षांपूर्वीथोड्याफार फरकाने परिस्थिती आजही तशीच आहे असे लेख वाचल्यावर वाटले.
prgdeshmukh@yahoo.com
5 वर्षांपूर्वी" सरकारनेसुद्धा शक्यतो विवाहितांना नोकरी देण्याच्या अटी"ची लेखकाची त्याकाळची मागणी आज मोठी मौजेची वाटते.
sugandhadeodhar
5 वर्षांपूर्वीप्रस्तावना न वाचता लेख वाचला तर सांप्रत स्थिती वर्णन करणारा नुकताच लिहिलेला लेख वाटेल!
tanaji24gaikwad@gmail.com
5 वर्षांपूर्वीसध्याचे वास्तव आहे आपला लेख वाचून तरुण पिढीने स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे
arvindchavan77777@gmail.com
5 वर्षांपूर्वीलेख आवडला. तत्कालीन असणारे प्रश्र्न आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहेत. असो पण 1949 चे समाजातील बालविवाह, पास झालेला विधवा विवाहाचा कायदा. व त्या वेळचा या प्रश्र्ना कडे पाहण्याची दृष्टी यांचे आकलन झाले.
Amrish
5 वर्षांपूर्वीSthal kaal nirapekha ase anek mudde ahet ya madhe...interesting to read ...thnx fr thought triggering feast....( medical aspect not covered though)
किरण भिडे
5 वर्षांपूर्वीयाहून अधिक चांगली प्रतिक्रिया काय असू शकेल? :-) धन्यवाद, अजित जी. म्हणजे आपली लेखांची निवड ठीक आहे तर...
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीलेखावरील तारीख ,चुकून जुलै १९४९ अशी पडली आहे का? मला तर हा लेख, मे २०२० मधील वाटतोय...