शाहीर दादा कोंडके आणि विच्छा

पुनश्च    वि. ग. सातारकर    2020-05-13 06:00:11   

अंक : मोहिनी, जानेवारी १९६८  लेखाबद्दल थोडेसे :  दादा कोंडकेंनी मराठी चित्रपटसृष्टीत जे यश मिळवले त्याला  केवळ 'चमत्कार' हेच नाव शोभू शकेल. चमत्कारांची मीमांसा करता येत नाही, चमत्कार पुन्हा पुन्हा घडत नाहीत आणि चमत्काराला नमस्कार करण्याशिवाय पर्यायही नसतो.  अनेकांना आज दादा कोंडके माहिती आहेत ते ओळीने नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देणारा कलावंत,लेखक, दिग्दर्शक म्हणून. त्यांच्या ' विच्छा माझी पुरी करा' या वगनाट्याचा आजही दबदबा आहे, परंतु 'विच्छा'ला यश मिळाल्याच्या सुरुवातीच्या काळांत दादांकडे कसे पाहिले जात होते, रंगभूमीवरील त्या चमत्काराचे वर्णन कसे केले जात होते? या प्रश्नांची अतिशय शैलीदार भाषेत उत्तर देणारा हा अत्यंत प्रवाही, प्रभावी  माहितीपूर्ण लेख आहे. हा लेख प्रसिद्ध झाला १९६८ साली, त्यानंतर अवघ्या दोन वर्षात दादांनी 'सोंगाड्या'ची निर्मिती करुन रंगभूमीला 'रामराम' केला. परंतु या लेखात मात्र असे म्हटले आहे की, 'सिनेमांत काम करण्याची विनंती त्यांनी सरळ धुडकावून लावली. सिनेमा हे आपले कार्यक्षेत्रच नव्हे, असे त्यांना वाटते.' भविष्याच्या पोटात काय दडलेले असते कोणी सांगावे? 'तूच माझी चिमणी' या नावाचे नवे वगनाट्य दादा बसवित असल्याचे हा लेख सांगतो, परंतु एकदा सिनेमाचा पडदा पाहिल्यावर दादा तिथेच रमले, त्यामुळे हे नाटक बहुधा आलेच नसावे. दादांच्या 'विच्छा'चे २५० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने हा लेख लिहिलेला आहे. त्यात लेखक सुरुवातीला म्हणतो, 'हा प्रयोग पहायला गेलो तेव्हा ‘एनी एक्स्ट्रॉ टिकेट प्लीज?’ हा प्रश्न थिएटरमध्ये पाऊल टाकीपर्यंत दहापांचजणांनी तरी मला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


नाटक रसास्वाद , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. suhasnannajkar07@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    दादा कोडंके यांच्या विषयी माहिती छान दिली लेख आवडला

  2. suhasnannajkar07@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    दादा कोडंके यांचा जीवन पट व त्यांच्य विषयी अंत्यत छान माहिती सांगितली, लेख आवडला.

  3. rajandaga

      5 वर्षांपूर्वी

    Comfortable Not very informative

  4. Rahulmuli

      5 वर्षांपूर्वी

    एक महत्त्वाची माहिती या पाल्हाळ लेखात नाही. ती म्हणजे विच्छाचे आधीचे नाव‌.

  5. abhimandhawas3@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    ऊत्कृष्ट

  6. abhimandhawas3@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान माहिती देणारा लेख

  7. भाऊसाहेब जपे

      5 वर्षांपूर्वी

    बहु आयामी दादा बद्दल जेवढं वाचावं तेवढं कमीच आहे. छान लेख माहितीसाठी पोस्ट केल्याबद्द आयोजकांचे आभार.

  8. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    छान माहिती देणारा लेख . एकटा जीव वाचलेले आहे . जन्मजात कलावंत .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts