विसुभाऊ राजवाड्यांचे व्यक्तित्व

पुनश्च    दि. वि. काळे    2020-05-09 06:00:50   

अंक : सह्याद्री, फेब्रुवारी १९५३ इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी मराठीत आदर्श संशोधनाचे उदाहरण घालून दिले. अनेक अस्सल कागदपत्रे शोधून काढली. संशोधन, व्याकरण, भाषाशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी मराठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रास मोल प्राप्त करुन दिले.   'महाराष्ट्राचा वसाहतकाळ', 'राधामाधव विलासचंपू', 'महिकावतीची बखर', 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आदि दस्तावेजांमुळे राजवाडे यांच्या संशोधनाचे मोल लक्षात येते. त्यांनी अत्यंत कष्टाने ही जूनी कागदपत्रे शोधून काढली. 'राधामाधव विलासचंपू' हे शहाजी महाराजांचे चरित्र आहे तर 'महिकावतीची बखर' ही केळवे-माहिम परिसराचा म्हणजे उत्तर कोकणाचा इतिहास सांगणारी बखर आहे. ती  १४व्या शतकात लिहिली गेली होती आणि प्रत्यक्ष बखरीत लिहिलेला इतिहास साधारणतः इसवी सन ११३८-४० च्या आसपासचा आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा लेख लिहिताना तर त्यांनी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या विवाहापासून, म्हणजे महाभारतपूर्व काळातील उदाहरणांपासून टिपणे काढली होती. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अशा व्यक्तींच्या स्वभावाची, वागण्याची, सामाजिक आचारांची उकल करणे सोपे नसते. वर वर अनेकदा अशा व्यक्ती एककल्ली, विक्षिप्त, तऱ्हेवाईकही वाटू शकतात. राजवाडे यांच्या निधनाला  २६ वर्षे झाली तेंव्हा म्हणजे १९५३ साली लिहिलेल्या या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशा विविध पैलूंचा उहापोह आहे. त्यांच्याविषयी वाचल्यावर अनेकांना त्यांनी गोळा केलेले, संशोधन-साहित्य वाचावेसे वाटेल, राजवाडे यांचे हे संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर वाचता येईल. जवळपास १२०० पृष्ठे भरतील एवढा मजकूर तिथे जतन केलेला आहे. स्वदेश आणि स्वभाषाभिमानाला कृति ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सह्याद्री , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. rajandaga

      5 वर्षांपूर्वी

    Very Good

  2. sagard51297@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    इतिहासाचार्य राजवाडे यांच्या इतिहास संशोधनाचा व राजकारणातील भूमिकांचा तपशिलवार अभ्यासासाठी सदानंद मोरे यांच्या पुस्तकरूपातील लेखमाला अभ्यासाव्यात.

  3. mailimaye@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    Surekh !

  4. Jayantgune

      5 वर्षांपूर्वी

    अहिताग्नि राजवाडे सुद्धा फार थोर होते. त्यांच्यावरचा एखादा लेख मिळाला तर नक्की प्रसिद्ध करा

  5. Jayantgune

      5 वर्षांपूर्वी

    राजवाड्याची आजच्या पिढीला ओळख करून देणारा लेख चांगला आहे. शब्दार्थ देताना काळजी घ्यावी. वक्रोक्ती म्हणजे sarcasm अधिक सुयुक्तिक होईल



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts