माथेरान – भाग १


या महिन्याच्या अनुभव कथन सदरातील हा लेख अंक : भारतसेवक, जानेवारी १९१६ लेखाबद्दल थोडेसे : भारतातील काहिली आणि उष्मा सहन होत नसल्याने गोरे राज्यकर्ते कायम थंडाव्याच्या शोधात पहाडी, उंच विभागात हिंडत असत. त्यातूनच आज आपल्याला ज्ञात असलेली थंड हवेची ठिकाणे शोधली गेली. इंग्रजांचे राज्य येऊन गेले नसते तर पर्यटनाची ही स्थळे कदाचित आजही विकसित झाली नसती. कदाचित काय, झालीच नसती. माथेरान हे तसेच एक ठिकाण.  ठाणे जिल्ह्याचे तत्कालिन कलेक्टर  ह्यूज पॉन्ट्झ मॅलेट यांना १८५० साली माथेरान परिसरातील थंड वातावरणाचा शोध लागला. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या हस्ते लगेचच माथेरानच्या विकासाची मुहुर्तमेढ झाली. पुढील काही वर्षांत माथेरान हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आणि काही श्रीमंत भारतीय व्यक्तींचेही उन्हाळ्यातील विश्रांतीस्थान म्हणून लोकप्रिय झाले. मुंबईला अगदी लागून असल्याने ते लवकरच लोकप्रिय झाले, तेथील पर्यटनाचा विकास झाला. तिथे पोहोचण्याची सोय व्हावी म्हणून सर आदमजी पीरभाई या पारशी गृहस्थाने १९०७ साली छोटी ट्रेनही सुरु केली. तेंव्हापासून आजतागायत ही ट्रेन हे माथेरानचे एक आकर्षण आहे. १९०७ साली ही ट्रेन बांधली तेंव्हा माथेरान सर्वसामान्यांच्याही आवाक्यात आले, त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९१६ साली लिहिलेला हा लेख आहे. तब्बल १०४ वर्षांपूर्वी कमळाबाई किबे यांनी माथेरानची सफर केली होती. कमलाबाई किबे या काही सामान्य गृहिणी नव्हत्या. किबे हे इंदूरच्या होळकर संस्थानातील  एक सरदार होते. ते मूळचे कोकणातले, इंदूरात अधिकारी म्हणून गेल्यावर त्यांनी तेथे मराठी भाषेचा प्रसार केला. ते स्वतः चांगले लेखक-वाचक होते. कोल्हापुरातील सरदेसाई घराण्य

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


स्थललेख , अनुभव कथन , प्रवास वर्णन , भारतसेवक

प्रतिक्रिया

  1. ramakantmhaski1964@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर प्रवासवर्णन. 1916 ची माथेरान ची वस्तुस्थिती ची माहिती प्राप्त झाली. लेख वाचताना हुबेहूब माथेरान ला जात असल्याबाबत जाणवले.

  2. kuldeepghorpade116@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख आहे.

  3. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.लेखिकेने माथेरानचे वर्णन छान केले आहे.

  4. Axay27

      5 वर्षांपूर्वी

    Atishay sundar....junya Matheran chi mahiti avadli....tyat to bhaji bajar Ani tyanchi vyavastha atacha lockdown la sajeshi ahe....lekhikecha nisargakade pahun kelela mukta lekhan manala bhavta

  5. randhirshinde76@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर , प्रवास आणि स्थलदर्शनाचा उत्तम नमुना. विसाव्या शतकारंभी एका स्त्रीने माथेरानचा घेतलेले अनुभव फार चांगल्या पद्धतीने कथन केला आहे. प्रवासवर्णने सामाजिक जीवनाचा विश्वसनीय आरसा असतो अर्थाने असे लेखन महत्त्वाचे ठरते.

  6. Anand G Mayekar

      5 वर्षांपूर्वी

    Dear Sir, It's pleasure to receive such soothing article in present HOT n HECTIC situation. Detailed information given is appreciated. Request to cover all points of Matheran, so that people st least can enjoy cooling effect even by sitting at home. Also try to explore many such places for enrichment of knowledge of people. Thanks



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts