असा आहे आमचा मराठवाडा


अंक : चित्रमयजगत , जानेवारी १९५७ लेखाबद्दल थोडेसे : आज मराठवाड्याची प्रसारमाध्यमांत चर्चा होते ती दुष्काळी प्रदेश किंवा पाण्याची टंचाई असलेला भाग म्हणून. या चर्चेत तथ्य आहे यात वादच नाही, परंतु मराठवाडा म्हणजे काही एवढेच नव्हे. साहित्य,संस्कृती, स्वातंत्र्यलढे, उद्योग अशा सर्वच अंगांनी हा प्रदेश समृद्ध आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तेंव्हा हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. मराठवाड्याचा बराचसा भाग निजामाच्या ताब्यात होता. तेंव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली नवा स्वातंत्र्यलढा सुरु झाला त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असे नाव दिले गेले. रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी हा संग्राम तीव्र केला त्यातून अखेर  १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा स्वतंत्र होऊन तो स्वतंत्र भारताचा भाग झाला. त्यामुळेच या परिसरावर अजूनही उर्दू संस्कृती-भाषा यांची छाप आहे, मात्र ती मराठीशी आता एकरुप झाली आहे. संत एकनाथांची भूमी असलेल्या या भागाचा विकास व्हावा यासाठी १९९४ रोजी विकास मंडळांची स्थापना झाली. पुढे औरंगाबाद ही उद्योगनगरी झाली. अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्रभाकर बागले, श्रीकांत उम्रीकर, सुहास जेवळीकर, चंद्रकांत कुळकर्णी, प्रशांत दळवी अशा अनेकांनी  मराठवाड्याला विविध क्षेत्रात वैभव प्राप्त करुन दिले आहे. त्या परिसराचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारा हा लेख.  चित्रमयजगत च्या जानेवारी १९५७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** प्राचीन इतिहासांत ‘रट्ट’ आणि ‘म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , स्थललेख , स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    खूपच विस्तृत माहिती देणारा लेख आहे ज्ञानात छान भर पडली .

  2. suhasnannajkar07@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान माहिती पण श्री गणेशाचे दोन गावची नावे सांगितली पण ती चुकीची आहे ऐक गाव गंगामसला ता.माजलगावं दुसर लिंबागणेश ता.बीड असे आहे

  3. daherenkoji@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    माझ्या जन्मा अगोदरचा हा लेख..आज उणीपुरी ६२-६३ वर्षे झाली, माझ्या मराठवाड्याचा दैदिप्यमान इतिहास आपल्यामुळे समजला. जुजबी माहिती होती..पण या लेखाने, मंदिरापुढची दीपमाळ लख्ख उजळावी, तसा मराठवाड्याविषयी ज्ञानाचा प्रकाश उजळला. खूप खूप आभार..आपण हे निश्चित महान कार्य आरंभले आहे..यात उदंड यश लाभो, ही सदिच्छा.!

  4. kuldeepghorpade116@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती मिळाली.

  5. prasadj21@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    मराठवाड्याचा न्यूनगंड दुर करणारा लेख. शेवटचा पॅऱाग्राफ वाचताना जाणवले की 1957 ला जशी परिस्थिती होती त्यात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फार काही फरक पडलेला नाही. विशेषतः राज्यकर्त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टीकोण हा १९५७ सारखाच आहे. हा महत्वपूर्ण लेख वाचकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल पुनश्च चे आभार.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts