अंक – अभिरुचि – दिवाळी, १९८१ लेखाबद्दल थोडेसे : एका मोठ्या माणसानं दुसऱ्या मोठ्या माणसाविषयी मनापासून लिहावं असा फार दुर्मीळ योग आजच्या या लेखासंबंधी घडून आलेला आहे. इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक ए. बी शहा हे साठ आणि सत्तरच्या दशकातील मराठी-इंग्रजीतील सुधारणावादी वैचारिक, साहित्यिक चळवळीतील आघाडीचे विचारवंत. तर दिलिप चित्रे हे कवी, समीक्षक, चित्रकार, इंग्रजी भाषेचे जाणकार आणि सेक्युलर विचारांचे कट्टर पाठीराखे. शहा यांच्या वैचारिक प्रभावाखाली आणि नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. १९८१ साली शहा यांच्या निधनानंतर चित्रे यांनी अभिरुचीच्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख आहे. यातून केवळ शहा यांचे व्यक्तिचित्र उभे राहात नाही, तर तेंव्हाचे सामाजिक, राजकीय वातावरण, वैचारिक प्रवाह आणि मानवी स्वभावाचे हळवे पैलूही दिसून येतात. आपल्या वाचन श्रीमंतीमध्ये मोलाची भर घालणारा हा लेख आहे. १९८१ च्या अभिरुची दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** मी त्यांना भाईजी म्हणत असे. गेली सोळा वर्षे माझा आणि त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. १९६५ ते १९६९ ही चार वर्ष मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो. पुढे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडमची नोकरी मी सोडली तरी आमचं काम चालू राहिलंच. १९७८ साली मी अमेरिकेतून परतलो तेव्हा ते निवृत्त व्हायच्या गोष्टी बोलू लागले होते. ‘न्यू क्वेस्ट’चं संपादन मी हाती घ्यावं आणि मुंबई सोडून पुण्यात स्थायिक व्हावं असा त्यांचा आग्रह होता. मी संपादकत्व पत्करलं पण पुण्याला स्थायिक होणं मला शक्य नव्हतं. दोन वर्षांनी मी संपादकत्वाचा राजिनामा दिला. गेल्या दीड वर्षात आमच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Diwakar
5 वर्षांपूर्वीखूप सुंदर. . .
Sunanda
5 वर्षांपूर्वीmukunddeshpande6958@gmail.com
5 वर्षांपूर्वीअप्रतिम व्यक्तिचित्रण
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीनेमके व्यक्तीचित्र !!
skalvit23@gmail.com
5 वर्षांपूर्वीउत्तम लेख !
pankajpatil.pp252@gmail.com
5 वर्षांपूर्वीचांगला आहें
rajandaga
5 वर्षांपूर्वीVery good
Anil Chavan
5 वर्षांपूर्वीhemant.a.marathe@gmail.com
5 वर्षांपूर्वीपहिल्यांदाच वाचलं, शहांबद्दल, धन्यवाद, माहीती मिळाल्याबद्दल
pankajpatil.pp252@gmail.com
5 वर्षांपूर्वीअप्रतिम आहे