अंक : किर्लोस्कर मासिक , ऑगस्ट १९३१ लेखाबद्दल थोडेसे : भारताच्या इतिहासात १९३१ चा काळ हा दूरवर स्वातंत्र्याची पहाट दिसू लागल्याचा काळ होता. हळूहळू आपण त्या दिशेने जात आहोत ही जाणीव जनमनात रूजू लागली होती. अशा वेळी समाज चिंतकांच्या मनात पहिला विचार हा येत होता, की उद्या स्वातंत्र्य मिळाले तर देश चालविण्यासाठी विविध प्रकारची योग्यता असलेल्यांची उणीव भासायला नको. तेव्हा तरुणांच्या मनातील आकाक्षांचा अग्नी चेतवणे गरजेचे होते. कधी उपदेश, कधी विनोद, कधी आवाहन तर कधी आग्रह अशा विविध प्रकारांचे लेख प्रसिद्ध करुन नियतकालिके देश उभारणीसाठीचे प्रयत्न करत होते. प्रस्तुत लेखात विनायक वैद्य यांनी विनोदाचे, थोडे मिश्कीलपणाचे पांघरुण घेत हेच काम केलेले आहे. नोकरीच्या मागे लागणाऱ्या मराठी तरूणांनी उद्योग,व्यवसायाकडे वळावे यासाठीचा एक प्रयत्न म्हणजेच हा लेख. या लेखात ओघाओघात 'भय्या' असा जो उल्लेख आलेला आहे, तो आपण आज ज्या बिहारी, युपीतील श्रमीकांचा भैय्या असा उल्लेख करतो, त्यांचाच असेल तर 'भैय्या' महाराष्ट्रात आलेल्यालाही आता शंभर वर्षे होत आली असा त्याचा अर्थ होतो. अर्थात लेखातला हा केवळ एक छोटा उल्लेख, बाकी लेख आधी म्हटल्यानुसार पायाभरणीच्या हेतूने लिहिलेला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही केलेली ही उजळणी आपल्याला 'जबाबदारीचा' संदेश सहजच देऊन जाते. ९० वर्षांपूर्वी किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** आमचे स्वतःवर इतके आंधळे प्रेम असते की त्यामुळे आपला आत्मघातकीपणा आम्हाला दिसत नाही. बारकाईने आत्मपरीक्षा करून दोष घालविले तर मात्र आपण आपले खरे मित्र होऊं. इंग्रजांनी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .




















vilasrose
6 वर्षांपूर्वीलेख खूपच आवडला.मार्च 2020 पासून गेल्या 6 महीन्यापासून करोना या सुक्ष्म विषाणू सर्व जगाला कसे वेठीस धरले आहे,त्याबाबत अतिशय व्यवस्थित विवेचन केले आहे.
vilasrose
6 वर्षांपूर्वीलेख खूपच आवडला.90 वर्षापूर्वीचा लेख असूनही आजच्या मराठी माणसांना विचार करायला लावणारा आहे.नोकरी न करता उद्योगात शिरण्यास प्रव्रुत्र करणारा लेख आहे.
chandratre_adv@yahoo.co.in
6 वर्षांपूर्वीफारच छान लेख. परिस्थितीत अजून फरक नाही.!
dspkop@gmail.com
6 वर्षांपूर्वीखूपच छान लेख.सध्या सुध्दा लागू पडतो.
seemajadhav46@gmail.com
6 वर्षांपूर्वीलेख खूपच स्फूर्तिदायक आहे आजही वाच्णाऱ्याने बोध घ्यावा असा आहे. असेच सुंदर आणि जगण्याला अर्थ देणारे साहित्य वाचायला मिळू देत. लेखाबद्दल बहुविध चे आभार.
atmaram-jagdale
6 वर्षांपूर्वीकाही दुर्गुण आजही समाजात तसेच आहेत
mukunddeshpande6958@gmail.com
6 वर्षांपूर्वीप्रेरणा दायक लेख
Djoshi
6 वर्षांपूर्वीखूपच छान लेख आहे. विषया प्रती सकारात्मक विचार असणे हेच गरजेचे आहे.
hemant.a.marathe@gmail.com
6 वर्षांपूर्वीटोकदार पण उत्साह पूर्ण लेख आहे, एवढ्या वर्षानंतर देखील हे विचार लागू पडतात.
sidhayevarsha277@gmail.com
6 वर्षांपूर्वीव्यवसाय करण्याची आवड,त्यातील नुकसान सहन करण्याची धमक सगळ्यांमध्ये थोडीच असणार!
prgdeshmukh@yahoo.com
6 वर्षांपूर्वीनोकरी करणं सर्वथा वाईटच असतं असं नव्हे. तिथेही कौशल्य सिद्ध करून प्रगती साधता येते. कितीकांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर व्यवसाय साधला आहे. व्यवसायात तोटा सहन करावा लागतो तो कौशल्याविना असेल तरच. उगीचच नशीबाच्या नावाने बोटे मोडली जातात.
daherenkoji@gmail.com
6 वर्षांपूर्वीतडाखेबंद लेखणी..आजही तेवढीच गरज आहे, तरूणाईच्या धमन्यात जोश भरण्याची..आणि काही कलाकृती सार्वकालिक अजरामर का ठरतात, ते हा लेख शिकवितो. आमच्या अधःपतनाला आम्ही जबाबदार..! हे एकदा उमगले, की त्याबाहेर निघण्याची दिशा सापडते आणि आत्मविश्वास निर्माण होतो..! हेच या लेखाचे, त्याच्या टवटवीत असण्याचे गमक आहे.