अंक – एकता (दिवाळी अंक), नोव्हेंबर-डिसेंबर २००५ लेखाबद्दल थोडेसे : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व अर्थाने युगप्रवर्तक प्रतिभावंत होते. ज्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना,प्रजाहिताच्या असंख्य योजना जन्माला आल्या तो राजा सृजनाचा धनी असणे योगाने आलेच. खुद्द शिवाजी महाराजांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडला, त्याचे संतसाहित्य अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी केलेले हे निरूपण. त्यातून महाराजांच्या व्यक्तिमत्वातील साहित्य प्रतिभेचा पैलू अधिक उजागर होतो- ******** छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. पण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होता. हे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका ‘अभंग’ रचनेतून स्पष्ट होते. अशा त्याच्या अजूनही काही रचना मिळू शकतात. त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. तंजावर येथे सापडलेल्या अभंगाबद्दल निरूपणकार डॉ. देखणे यांचा विशेष लेख आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवरायांचे मोठेपण अनन्यसाधारण असे आहे. लोककल्याणकारी राजा, प्रजाहितदक्ष राजा, सामान्यांच्याही मनात स्वराज्याची अस्मिता चेतविणारा राजा, भविष्याचा वेध घेत दूरदृष्टीने पाऊले टाकणारा द्रष्टा राजा, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही चारित्र्याचा महान आदर्श उभा करणारा राजा अशा विविधांगाने छत्रपतींचे व्यक्तिमत्व आदर्शवादी ठरले आहे. आदर्श राजा कसा असावा हे सांगताना एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे, दाक्षिण्यं स्वजने दया परजने शाठ्यां सदा दुर्जने। प्रीतिः साधुजने, नयो नृपजने विद्वज्जनेष्वार्जवम्। शौर्य शत्रुजने, क्षमा गुरुजने, नारीजने धूर्तता। स्वकीयांविषयी दक्षता, परकीयांविषयी दया, दुष्टांशी शठपणा, सज्जनावर प्रेम, न्यायाच्या बाबतीत नीतिप्रियता, विद्वानांविषयी नम्रता, शत्रूशी पराक्रम, वडीलधाऱ्यांच्याविषयी आदरभाव आणि स्त्रियांच्या बाबतीत धूर्तपणा या गोष्टी ज्या राजाच्या ठायी असतात तो आदर्श राजा म्हणून उभा राहतो. शिवाजीराजा राजनीतिचा आदर्श होता आणि नीति राज्याचा प्रणेता होता. अध्यात्मधिष्ठीत राजकारणाचा पुरस्कर्ता होता तर राजकारणच अध्यात्माच्या पातळीवर नेणारा सामर्थ्यशाली राजकर्ता होता. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजीमहाराजांच्या महनीय गुणांचे वर्णन करताना म्हटले आहे, निश्र्चयाचा महामेरू। बहुतजनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।। यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवान, नीतिवंत याबरोबरच प्रतिभावंत म्हणूनही छत्रपतींच्या जीवनातील एक वेगळ्या पैलूचे दर्शन घडते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवजीमहाराज हे खऱ्या अर्थाने प्रतिभावंत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांकडून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांनी रचलेला एक अभंग तंजावर येथील सरस्वती महालामध्ये उपलब्ध झाला आहे. अभंगाची नाममुद्रा सोडली तर तो अभंग एखाद्या संतांच्या मुखातून बाहेर पडावा इतका प्रासादिक आणि ओजपूर्ण आहे. नाशिवंत सुखासाठी। अंतरला जगजेठी।। नाही नाही यति गोडी। लक्ष चौऱ्यांशीची जोडी।। मनुष जन्म गेल्यावारे। काय करशील बारे।। शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना।। हा छत्रपती शिवरायांचा अभंग संतपरंपरेतील अभंग वाटावा असा आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीछान लेख . एका नव्या पैलू वर प्रकाश टाकला आहे .
adeshbahekar010@gmail.com
5 वर्षांपूर्वीअप्रतिम
ppkchemicals@gmail.com
5 वर्षांपूर्वीसुंदर
ShridharD
5 वर्षांपूर्वीउत्तम माहिती
pimpleuday007@gmail.com
5 वर्षांपूर्वीखूपच छान लेख.छत्रपती शिवाजी महाराजांचा जगाला माहित नसलेला आगळावेगळा पैलू माहित झाला
hemant.a.marathe@gmail.com
5 वर्षांपूर्वीविचारप्रवर्तक स्पष्टीकरण