विश्वव्यापी रीडर्स डायजेस्ट

पुनश्च    श्री सुखबीर    2020-08-12 06:00:01   

अंक – नवनीत मराठी डायजेस्ट – जून १९६९ लेखाबद्दल थोडेसे : रीडर्स डायजेस्ट हे जागतिक प्रकाशन विश्वातलं एक आश्चर्य आहे. १९२२ साली सुरु झालेल्या या मासिकाचा खप प्रकाशनाची शतकपूर्ती होत असताना पूर्वीएवढा अवाढव्य राहिलेला नाही, तरीही इतर प्रकाशनांची अवस्था पाहता रीडर्स डायजेस्टची अवस्था अजूनही चांगली आहे असेच म्हणावे लागेल. रीडर्स डायजेस्टची भारतीय-पाकिस्तानी अशी जोड आवृत्ती १९५४ साली ४००० हजार प्रतींनी सुरु झाली होती, ती २००८ साली ६ लाखांपर्यंत पोचली होती. सुरुवातीला रीडर्स डायजेस्ट भारतात टाटा ग्रुपतर्फे प्रकाशित होत होते, ते पुढे लिव्हिंग मीडियाकडे गेले. आज जगात सर्वत्र मासिका- नियकालिकांना सोशल मीडिया, ओटीटी यांच्याशी स्पर्धा करावी लागत असूनही भारतात अजूनही रीडर्स डायजेस्टचा खप महिन्याला लाखांच्या घरात आहे. या मासिकाचा जन्म,त्याची संकल्पना आणि वाढ याची मनोरंजक माहिती देणारा हा  (बहुधा अनुवादित) लेख पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. आजही हे मासिक टिकून आहे, त्यामुळे या लेखाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. जून १९६९ साली नवनीत मराठी डायजेस्ट मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** जगात सर्वात अधिक प्रती छापण्यात येत असलेले मासिक कोणते असे जर विचारले तर त्याचे उत्तर “रीडर्स डायजेस्ट” असे द्यावे लागेल. दर महिन्याला चौदा भाषांमधून मिळून त्याच्या दोन कोटी ऐशी लाख प्रती छापल्या जातात. त्याच्या आवृत्त्या निघतात तीस. त्यांपैकी एकेक आवृत्ती असते खास विद्यार्थीवर्गासाठी. आणि पाच आवृत्त्या असतात अंधांसाठी. ह्या आवृत्त्या ‘ब्रेल’ पद्धतीने पाच निरनिराळ्या भाषांतून छापण्यात येतात. जगातील शंभराहून जास्त देशांत ह्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


संस्था , नवनीत मराठी डायजेस्ट

प्रतिक्रिया

  1. Anantkapse

      4 वर्षांपूर्वी

    चांगली माहीती.

  2. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    रिडर्स डायजेस्टबद्दल छान माहिती दिली आहे!

  3. kaustubhtamhankar

      5 वर्षांपूर्वी

    Reader's Digest च्या प्रमाणे बहूविध पण असेच प्रसिद्धीस पावो.

  4. mukunddeshpande6958@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपुर्ण, छान

  5. mailimaye@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    Ashi sundar kalpkata !!!! reders digest chya premat khup lok ahet. Satatya ani tatvanishtha yancha milaf !!!!

  6. rajandaga

      5 वर्षांपूर्वी

    खुप रंजक

  7. hemant.a.marathe@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    एवढी वर्षे फक्त ऐकून होतो, पहिल्यांदाच सविस्तर माहिती मिळाली, पुनश्च चे शतशः आभार

  8. daherenkoji@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    रिडर्स डायजेस्टचा खूप रंजक आणि माहितीपूर्ण इतिहास मांडला आहे.

  9. Shrutissr

      5 वर्षांपूर्वी

    Awesome Information..Thank you Bahuvidh for sharing this!

  10. Praveen

      5 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख व रोचक माहिती

  11. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    आतिषय सुंदर आणि रोचक माहिती . आहे . बहुविध मध्ये सुदधा असे वैविध्य आणता येईल .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts