काही विचित्र लग्नपद्धती


अंक : वाङ्मयशोभा, मे १९६०

लेखाबद्दल थोडेसे : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पुरातन काळापासून विवाहाच्या किती विविध पद्धती, रुढी, परंपरा, समज अस्तित्वात होते हे राजवाड्यांनी त्यात सांगितले आहे. कालानुरुप विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संकल्पनाही बदलत गेल्या. भारतात शहर-गावांव्यतिरिक्त जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या शेकडो आदिवासी जमाती गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. विवाहाच्या पद्धती आणि रूढींच्या बाबतीत त्यांच्यातही अनेक चमत्कारिक वाटतील असे प्रकार आहेत. त्यांविषयी माहिती देणारा हा लेख ६० वर्षांपूर्वीचा आहे. दरम्यानच्या काळात कदाचित यातील अनेक जमाती नष्ट झाल्या असतील किंवा त्यांचे नागरीकरण झाले असेल. कालौघात ते झालेच पाहिजे, मात्र रुढी-परंपरांचा हा इतिहास आपल्या विवाह संस्कृतीबद्दल महत्वाचे भाष्य करतो.

********

जंगलांतून किंवा जंगलाच्या आसपासच्या भागांतून किंवा डोंगराळ प्रदेशांत व शहरी मनुष्यवस्तीपासून दूर रहात असलेल्या मागासलेल्या जमातींच्या लोकांच्या चालीरीती, त्यांचे आचारविचार नि संस्कृती यांबद्दल नागरी जीवन जगणाऱ्या शहरवासीयांना नेहमीच एक प्रकारच औत्सुक्य, आकर्षण आणि जिज्ञासा वाटते. या औत्सुक्याचंही एक कारण आहे. आपल्या शहरवासीयांच्या जीवनक्रमांत आणि संस्कृतींत हरघडी हरदिवशी बदल घडून येत आहेत. त्यामुळं आपली जीवनघडी पूर्वींपेक्षा कितीतरी बदलली आहे व बदलली जात आहे. पण या मागासलेल्या जमातीच्या बाबतींत मात्र तसं नाही. आजपासून कित्येक वर्षांपूर्वी त्यांचे वाडवडील, आजोबा पणजोबा ज्या प्रकारचं जीवन जगत होते तेच जीवन आजही ते जगतात. त्यांच्या चालीरीती व रूढी ज्या जुन्या काळी होत्या त्याच आजही आहेत. किंबहुना असं असल्यामुळेच आपण त्यांना मागासलेले म्हणतो. आजच्या त्यांच्या जीवनक्रमांत शेकडो, हजारो वर्षांपूर्वीच्या जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला पहायला सांपडतं आणि यामुळंच त्यांच्याविषयी आपली जिज्ञासावृत्ती जागृत होत असते.

लेखक – श्रीकांत अ. रानडे

अंक : वाङ्मयशोभा, मे १९६०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , वाड्मयशोभा
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Mohan Ranade

      4 वर्षांपूर्वी

    भारतात अनेक चांगल्या परपरा आहेत.अगदी स्त्री स्वतंत्र आहे मात्र त्याचा अभ्यास न करताच आपण आपले ते सर्व वाईट अस समजुन आपलं पुरोगामी सिद्ध करणेचा प्रयत्न करत असतो



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts