अंक : अंतर्नाद, जानेवारी २०१०
सुनीताबाईंनी बघताक्षणी प्रथमदर्शनी डोळ्यांत भरायची ती त्यांच्या कांतीची लखलखीत प्रभा. गोरेपणाच्या फिकट पिवळ्या, गुलाबी, निस्तेज पांढऱ्या अशा अनेक छटा असतात. सुनीताबाईंचा वर्ण या सगळ्याच्या पलीकडचा होता. पुन्हा त्यांची एकूण जीवनसरणी बघता त्या सुवर्णकांतीसाठी त्यांनी काही खास प्रसाधनं वापरली असण्याची, उंची सौंदर्यसेवा घेतली असण्याची शक्यता नगण्यच. तेव्हा ती झळाळती कांती देवदत्त. तशीच तोंडातली भाषाही. थेट, नेमकी, धारदार, समोरच्याला ‘लागली’ तरी चालेल पण पुढेमागे, ‘मला असं म्हणायचं नव्हतं’, ‘माझे शब्द मी मागे घेते’ असा गुळगुळीत व्यवहार नको. ‘मला हेच म्हणायचं आहे आणि ह्याची दखल घेणं तुम्हांला भाग आहे!’ असा सगळा खाक्या. आवाजाची पट्टी वरची. बोलणं मोठ्यांदा. कोकणातली सानुनासिकता नसलेलं, पण कोकणी हेल असलेलं. वाक्याचे शेवटचे शब्द सोडून देण्याची लकब. त्यामुळे ऐकणाऱ्यावर जास्तच परिणाम व्हायचा. समोर बोलणाऱ्यांच्या बोलण्यातली छोटीही चूक, संदिग्धता जिथल्या तिथे दुरुस्त करण्याची घाई. त्याबाबतीत, एकेकाळी केलेली मास्तरकी आयुष्यभर पुरली असावी. पुल स्वत:ला ‘देशपांडे’ तर सुनीताबाईंना ‘उपदेशपांडे’ म्हणायचे. अशा किंवा असल्या सत्राशेसाठ कोट्या झेलण्यात सुनीताबाईंचं आयुष्य गेलं असणार; पण त्यांना हसण्यावारी घालवून स्वत:च्या हेतूंशी प्रामाणिक राहणंच त्यांनी निवडलं असणार, असं वाटतं. मुळात स्वत:चा, स्वत:च्या जगण्याचा काही हेतू असणं आणि त्याच्याशी निष्ठूरपणे प्रामाणिक राहणं ह्यांतला वैचारिक लखलखीतपणा ही त्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोच्च खासियत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rahul Muli
4 वर्षांपूर्वीअत्यंत आत्मीयतेने लिहीलेला सहजसुंदर लेख. अत्यंत मोजक्या शब्दांत सुनीताबाईंचे व्यक्तिचित्र यथार्थपणे रेखाटले आहे.
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर आणि ओघवता लेख. सुनीताबाईंचं अप्रतिम व्यक्तिचित्रण. धन्यवाद!
Sandhya Kadam
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
Nandkishor Lele
4 वर्षांपूर्वीअप्रतिमच उतरला आहे हा लेखही कारण आपण उभयतां विषयी खूप लिहलं आहे आणि ते अत्यंत वाचनीय आणि साहित्यिक मंडळीना अनुकरणीय असंच आहे.धन्यवाद.
Dr. Anuradha Deshpande
4 वर्षांपूर्वीसुनीताबाईंच्या तेजःपुंज व्यक्तिमत्वाची सुरेख मांडणी मंगला ताईंनी करून खरंच उत्कृष्ट माहिती उपलब्ध करून दिली आहे...
खुप सुंदर लेखन आहे
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीविलक्षण करारी सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पदर नेमक्या शब्दांत मंगलाताईंनी या ललितबंधात उलगडले आहेत. अंतर्नाद मध्ये वाचला होता हा लेख. परत वाचला.
Rupali Rajurkar
4 वर्षांपूर्वीसुनीता बाई विषयी माहिती या लेखात मिळाली . खरच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असतेच . खुप छान लेख
Milind Shinde
4 वर्षांपूर्वीसुंदर सहजीवनाचा ओघवता आलेख
Bhagyashree Chalke
4 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख. आदर्श सहजीवन म्हणजे काय ते पुल आणि सुनीताबाईंकडून शिकावं.
dhananjay deshpande
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख, दोघांनी मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
Anita Punjabi
4 वर्षांपूर्वीखूप सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख! वाचताना डोळे भरून येतात. एक अतिशय टोकाचे असे खरेखुरे व्यक्तिमत्त्व!
Suhas Mukawar
4 वर्षांपूर्वीपतिला सांभाळून घेणारी पतिव्रता. शब्द अपुरे पडतात.