अंक – सत्यकथा – जून, १९५१
लेखक – काका कालेलकर
आनंद क्षणिक असतो हाच मोठ्यांत मोठा आनंदाचा विषय आहे. लहान मूल गोड हंसते. पण जर का ते सदान्कदा हंसतच राहिले तर त्याची नि आपली काय दशा होईल? म्हणूनच माणसाने अखंड आनंदाचा आग्रह बाळगतां कामा नये. कित्येक आनंद क्षणमयच असतात. हीच त्यांची परमसिद्धी असते.काळवेळेनुसारच आनंदाची अपेक्षा ठेवली पाहिजे. त्यांत प्रसंगोचित औचित्यही असले पाहिजे. पण मुख्य गोष्ट म्हणजे आनंद परिमित असला पाहिजे. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आनंद भोगरूप होतां कामा नये. भोगाबरोबर कंटाळा असतोच; पण क्षीणताही असते. माणसाला भूक लागते व तो खातो. त्यांत सुख असते, समाधान असते. पण हा उच्च प्रकारचा आनंद नव्हे. कारण तो भोगरूप आहे. म्हणूनच समर्थ नाटककार नाटकांत कोठेही खायचे प्रसंग आणित नसतात. आजकालच्या नवलकथांत खाण्याच्या रसाची वर्णने येतात. त्याचे कारण नवलकथाकार आपल्या आसनावरून खाली उतरले आहेत. शृंगारही दोन असतात. विप्रलंभ व संभोग. यांत विप्रलंभ शृंगार यामध्ये अधिक सुंदर. आनंद भोगप्रधान व भावनाप्रधान असा दोन प्रकारचा असतो. भोगप्रधान आनंद क्षणजीवी असतो. माणसाला क्षीण करणारा असतो. असला आनंद दीर्घकाल मिळाला तर माणसाची आनंद भोगण्याची शक्तीही निकामी बनते, बोथट होऊन जाते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dr. Anuradha Deshpande
4 वर्षांपूर्वीकितीतरी सुरेख मार्गदर्शन मिळाले आहे या लेखातून... काकांचे खूप धन्यवाद????
Shankar Junghare
4 वर्षांपूर्वीखुप छान लेख आहे. वाचुन आनंद वाटला. काकाजी आपणास शतशः प्रणाम.
Santoshkumar Ghorpade
4 वर्षांपूर्वीसुंदर विवेचन केलंय काकाजींनी
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीकहा जाय तो आनंद का स्वरूप मालूम नही था ।वह कुछ कुछ आज समझा, और मेरे घर के परिसर में बगीचा लगाने के लिए जगह नही यह दुःख अब नही हो रहा है। क्योंकि मेरे सामने वाले पड़ोसी और बाजू के पड़ोसी की गार्डन और फूल पौधे मुझे आनंद देने लगे है।
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखुपचं सुंदर लेख . संपूच नये असे वाटत होतं . महान व्यक्त्तिमत्वा चे लोक किती सतज सोप्या भाषेत जीवनाबदल बोलतात .