बिठूर

पुनश्च    रा. भि. जोशी    2021-03-27 12:00:00   

अंकः मौज, दिवाळी १९५९

लेखाबदद्ल थोडेसे : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात असलेलं बिठूर हे गाव पौराणिकृष्ट्या तर महत्वाचं आहेच, त्या गावाशी महाराष्ट्राच्या भूतकाळाचं ओलाव्याचं नातं आहे. पौराणिक काळात याच गावातील आश्रमात लव-कुश वाढले, रामायणाची रचना झाली. इतिहासात याच गावात तात्या टोपेंचा वाडा होता. राणी लक्ष्मीबाईंचं बालपण इथंच गेलं. पेशवाईत तिकडे गेलेले तिनेकशे ब्राम्हण तिथे एकेकाळी वस्ती करुन होते. लेखक, समीक्षक रा. भि. जोशी हे याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत १९५७च्या सुमारास तिकडे गेले होते. त्या भटकंतीचा त्यांनी लिहिलेला हा लेखाजोखा १९५९ साली प्रसिद्ध झाला होता. तो वाचून आजही अंगावर काटा येतो..भूतकाळ माणसाला नेहमीच कातर करतो तो असा..

 ********

“शेषशायी भगवानाच्या नाभिकमलांतून ब्रह्मदेव वर निघाले ते ह्या ठिकाणी वर आले, म्हणून ह्याला ब्रह्मावर्त म्हणतात. हे आहे ब्रह्मेश्र्वर मंदिर, आणि सृष्टी निर्माण करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भगवान् ब्रह्मदेवांनी अश्र्वमेध यज्ञ केला, त्या घोड्याच्या पायाचा चांदीचा नाल हा इथे आहे. दुनियाभरमें इतना पवित्र अस्थान और कोई नहीं है.”

गंगेच्या त्या घाटावरच एका छोट्या दगडी मंडपाखाली एक चांदीचा नाल खिळे ठोकून बसवलेला गंगाप्रसादने मला दाखवला, त्याला मी वंदन केले.

“गंगाजीमें नहाकर कुछ पूजा वगैरह होना चाहिये बाबूजी.” तो पुढे म्हणाला.

पण मी बिठूरला आलो होतो तो बिठूर पाहण्यासाठी. मला कुणी तरी महाराष्ट्रीयन माणूस हवा होता. म्हणून मी त्याला म्हटले, “स्नानाचे वगैरे नंतर पाहू. मला तू आधी कोणा तरी दक्षिणी ब्राह्मणाच्या घरी घेऊन चल.”

ब्रह्मघाटाजवळ जेव्हा मी बसमधून उतरलो तेव्हा बसमध्ये उतारू असा मी एकटाच राहिलो होतो. बाकीचे सगळे गावांत बस शिरल्याबरोबर उतरून गेले होते. मला उतरवून बसदेखील निघून गेली आणि भर दुपारच्या वेळी मी तिथे एकटाच राहिलो. आसपास दुकाने वगैरे जी काय होती ती सगळी बंद होती. जवळपास माणसेही कुणी दिसत नव्हती. दिवस उन्हाळ्याचे आणि वेळ दुपारची होती हे खरे असले तरी गांव इतके पेंगले-सुस्तावलेले असेल अशी माझी कल्पना नव्हती. इकडेतिकडे हिंडलो तेव्हा कमरेला पंचा गुंडाळलेले आणि खांद्यावर अंगोछा टाकलेले एक गंगापुत्र मला दिसले त्यांनाच मी वाटाड्या केले, त्यांचेच नाव गंगाप्रसाद.

मला आधी दक्षिणी ब्राह्मणाकडेच जायचे आहे हे पाहिल्यावर तो म्हणाला, “चलिये, ले चलता हूं.” आणि मी त्याच्या मागून चाललो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज , इतिहास
स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. Ajay Kotwal

      4 वर्षांपूर्वी

    राम नाईकांना कळवले पाहिजे, म्हणजे ते पुन्हा उभं करतील

  2. Janhavi Godbole

      4 वर्षांपूर्वी

    अस्वस्थ करणारा इतिहास



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts