स्त्रीला आवडणारं सर्व प्रकारचं साहित्य या अंकांत आम्ही दिलं आहे असा दावा आम्ही करती नाही. तसा दावा कुणीही करणं अयोग्यच. आमचं म्हणणं असं की स्त्रीच्या आवडीचं, उपयोगाचं जे साहित्य इतर मासिकं वर्षानुवर्ष मुबलक देतच आली आण देत असतात त्यांतलं कांही आम्ही मुद्दामच टाळलं आहे, कांही जरूर तितकंच दिलं आहे. आणि बाकी सर्व नवीन प्रकारचं आहे.
आमच्या स्त्रीबरोबर तिचं हे मासिकही अधिकाधिक विकसित, प्रगत, प्रगल्भ व्हावं, बदलत रहावं, तिच्याशी समांतर वाटचाल अप्रतिहतपणे करून त्यानं तिची खऱ्याखुऱ्या अर्थानं मैत्रिण ठरावं एवढीच आमची इच्छा.
अंक : ललना, ऑगस्ट १९५९
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .