एकदा पुण्याला वसंत व्याख्यानमालेत, विठ्ठलरावांचे व्याख्यान होते – विषय काहीतरी लोकशाहीवर होता. गंमत म्हणजे या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून काकासाहेबांना बोलावले. आम्ही घरी सगळी मंडळी त्यांना खूप चिडवायला लागलो. विशेषतः यांच्या बहिणी काकांच्या समोर यांची बोलती कशी बंद पडणार बघ. मस्त फजिती होणार. आम्हाला इथे जोरजोरात दटावतो नाही का? तिथे अगदी घसा बसेल याचा, अशा त्यांना चिडवत होत्या. त्या दिवशी संध्याकाळी झाडून घरातली सगळी मंडळी व्याख्यानाला गेलो आणि अगदी पहिल्या रांगेत बसलो. मला मात्र मनातून धाकधूक वाटत होती. सभेची प्रथा अशी की, अध्यक्षांनी वक्त्याची ओळख करून द्यायची. काका ओळख करून द्यायला उभे राहिले. काकांनी एका वाक्यात यांची ओळख करून दिली. काका म्हणाले, “आजचा वक्ता कोण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. वर्तमानपत्रात तुम्ही वाचलेच असेल. तेव्हा या वक्त्याची ओळख मी चार शब्दांत करून देणार आहे. शेर का बच्चा शेरही होता है.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .

 
                                
                                    


















 
		 
                 
                 and then add to homescreen
 and then add to homescreen
Sandhya Tembe
4 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर लेख. राजकारणांत अशी सरळ, साधी माणसं होती. अनौपचारिक शैली.👌🏼🙏🏼
Sandhya Tembe
4 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर लेख. राजकारणांत अशी सरळ, साधी माणसं होती. अनौपचारिक शैली.👌🏼🙏🏼
Abhay Bapat
4 वर्षांपूर्वीछान लेख,आजच काकासाहेब यांचे आत्मचरित्र पथिक,त्यावर अत्रे यांनी लिहीलेला लेख याबद्दल चर्चा झाली आणि योगायोगाने आजच हा लेख वाचायला मिळाला.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान लेख
Shubhangi Kadganche
4 वर्षांपूर्वीछान लेख.
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीलेख आवडला. माझी माहिती अचूक असेल तर तर सुनिता ताईंच्या सुनबाई माननीय मेधा गाडगिळ आयएएस अधिकारी आहेत.
Sanjay Palkar
4 वर्षांपूर्वीखूप सुंदर लेख आहे
Amol Suryawanshi
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख...आवडला...भावनांरी भाषा