कृष्णपक्षात चंद्रराजाचं वैभव हळूहळू क्षीण होऊ लागतं. तो उशिरा उगवू लागतो. रातराणीचा बहरही औसरू लागतो. एक एक फूल गळू लागतं, सारी फुलं झडून जातात. खाली जमिनीवर फुलांच्या निर्माल्याचा खच पडतो. मागं शिलक राहते केवळ यौवनाची स्मृती! शृगाराची स्मृती! वैभवाची स्मृती! हा स्मृतिगंध आता तिच्या हृदयात दाटून राहतो. भूतकाळची मधुरमधुर स्वप्नं तिच्या दृष्टीपुढं नाचू लागतात. आपला मोहर ओसरला हे ती ओळखते. विचारमग्न बनते. विमनस्क बनते. तपस्या करू लागते. मनाला शांती मिळविण्याच्या शोधात राहते. अशा वेळी आपल्या प्रपंचाच भार मुलांवर सोपवून आपल्या नातवंडांना खेळवीत उरलेलं जीवन कंठणाऱ्या एखाद्या व्रताचरणी स्त्रीप्रमाणं ती वाटू लागते, किंवा क्षीणशक्ती ययातील राजासह वानप्रस्थाश्रमी होणार्या शर्मिष्ठेप्रमाणं वाटू लागते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .