तथापि वरील प्रकारच्या स्वतंत्र वातावरणांत वाढलेले तरुण समवयस्क, समबुद्धिमान परजातीय तरुण स्त्रियांशी मोकळ्या मनानें बोलतां बसतां जर त्यांच्यापैकीं कांहींमध्ये विवाहेच्छा उत्पन्न झाली तर त्यांत नवल तें काय ? अशा तरुणांस आपल्या इकडे विवाहाची सवलत स्वधर्मांत/ राहून मिळणे शक्य नाहीं व विद्येच्या प्रसाराबरोबर भिन्न भिन्न जातींमध्ये, एकाच जातींतील निरनिराळ्या पोटभेदांमध्ये व भिन्न धर्माच्या तरुणतरुणींमध्येही विवाहसंबंध होणारच, हे जेव्हां समाजांतील कांहीं अध्वर्युंच्या लक्षांत आले त्यावेळी अशा प्रकारचे विवाह म्हणजे कोणत्याही प्रकारानें गैर नव्हत असें मानणारे किंबहुना जातिभेद मानणेंच गैर असें प्रतिपादणारे ब्राह्मसमाजीय लोकांनी सरकारापाशी हे विवाह कायदेशीर गणले जावेत म्हणून कायदा मागितला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .