पंडित बुद्धिमान होते. व्यासंगी होते. बरें वाईट आयुष्य त्यांनी पाहिलेलें होतें. कलासृष्टीच्या विविध दालनांतून त्यांनी प्रवास केलेला होता. खदखदून हांसविणाऱ्या त्यांच्या विनोदी स्वभावाला स्वानुभवांची जोड होती. उधळलेल्या संसारामुळे त्यांत कारुण्याची धार होती. या गुणी कलावंताचा दम्यासारख्या रोगाने पाठपुरावा केला आणि त्यांना अकाली म्हातारें केलें. टीचभर भूमिकेंतदेखील प्राण ओतणारा आणि तीवर स्वतःचा कायम ठसा ठेवणारा असा प्रतिष्ठित नकलाकार कलावंत विरळा.
पुरुषोत्तम देशपांडे म्हणजे चैतन्याचा अखंड झरा. 'पानी तेरा- रंग कैसा। जिसमें मिलावे वैसा' असें त्यांचें वर्तन. ते असेपर्यंत त्यांच्या सहवासाचा कुणालाच कधीहि कंटाळा आला नाही. देशपांड्यांनी सर्वांनाच सदैव आनंद दिला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .