आचार्य आपल्या भाष्यांत कर्माला कर्तृत्व अनेकत्व तर ज्ञानाला अकर्तृत्व व एकत्व अपेक्षित असल्यामुळे ती दोन्हीं एका पुरुषाच्या आश्रयाने राहणे अशक्य आहे असें ह्मणतात. याचा अर्थ असा, की कर्तृत्वादि भावनाविरहित कर्म होणे शक्यच नाहीं. श्रीभगवंतांचें क्षात्रधर्म पालनादिक, अथवा ज्ञानोत्तर ज्ञानी पुरुषांचें कर्मामध्ये प्रवृत्तिरूप जें दिसतें तें कर्मच नव्हे असें त्यांनीं आपल्या उपोद्घात भाष्यांत लिहिलें आहे. ज्या भगवंतांच्या कर्माचा दाखला इतर ज्ञानी लोकांनीं कर्म करण्याच्या बाबतींत घ्यावा असें रहस्यकार ह्मणतात तें भगवानांचे क्षात्रकर्मादिक ' चेष्टित' निवळ शारीरव्यापाराप्रमाणे कर्माभासरूप आहे असें आचार्य ह्मणतात. “अविद्या प्रमाणबुध्या गृह्यमाणा क्रियाकारकफलभेदरूपा सती सर्वकर्महेतुत्वं प्रतिपद्यते । प्रमाणभूतेन वेदेन मम चोदितं कर्तव्यं कर्मेति हि कर्मणि कर्ता प्रवर्तते " (सर्व कर्मांची प्रवृत्ति होण्यास, क्रियाकारक फळ वगैरे भिन्न आहेत असें ज्यानें वाटतें तें अज्ञानच कारणीभूत आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .