बाटग्या ब्राह्मणाला दक्षिणा


शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी काही साहित्यिकांना, गौरव म्हणून मोठ्या रकमा देण्याचे जाहीर केले होते. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहून त्यास विरोध केला होता आणि त्या रकमेची संभावना 'रमणा' अशी केली होती. पेशवाईच्या काळात लोकप्रिय असलेला हा रमणा म्हणजे नेमका काय प्रकार होता, त्यांची गंमतीशीर हकीकत अ. का. प्रियोळकर यांच्या या लेखात आहे. शिवाय भ्रष्टाचाराला, औद्धत्यालाही जात-धर्म नसतो हेही यातून दिसते.  ब्रिटिशांच्या काळातली एक घटना.  ब्राह्मणांना मिळणारी मदत एकाने ख्रिश्चन धर्म पत्करल्यावर बंद झाली, तेव्हा त्याने 'ती बंद केली जाऊ नये, कारण ती मदत धर्माला नसून ज्ञानाला आहे', असा दावा केला होता. 'मनुष्य दानाला पात्र होतो तो त्याच्या कर्माने. जन्माने किंवा धर्माने नव्हे'. हे सूत्र सगळ्यांनाच मान्य असते. परंतु तरीही  आरक्षण, सवलती, जात, धर्म  आणि भ्रष्टाचार हे मुद्दे आज फेसबुक-युगातही वादांचे, चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. प्रस्तुत लेख वाचून आपल्या लक्षात येईल की युगानुयुगे आपण याच चर्चा करत आलो आहोत आणि करत राहणार आहोत. अ.का. प्रियोळकर हे मराठीतले नामवंत संशोधक, समीक्षक.  'डॉ भाऊ दाजी लाड', 'कविवर्य मोरोपंत', 'मुसलमानांची मराठी कविता' आदी आठ ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. 'विविधज्ञानविस्तारा'त ते सहसंपादक होते. अरूणोदय बी. ए. या नावाने त्यांनी कविताही लिहिल्या. १९७३ साली त्यांचे निधन झाले. ********** अंक- विविधवृत्त, दिवाळी १९५७ जच्चा बसलो होति नजच्चा होति ब्राह्मणो। कम्मुना बसलो होति कम्मुना होति ब्राह्मणो ति।। भगवान बुद्ध श्रावस्ती येथे आरामात असताना एकेसमयी आग्निक भारद्वाजाने प्रश्न केल्यावरून भ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , विविधवृत्त

प्रतिक्रिया

  1. mbjoshi

      6 वर्षांपूर्वी

    लेख चांगला आहे. रमण्यासंबंधीची माहिती रंजक वाटली. धन्यवाद!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts