प्रस्थापितांविरुद्ध बंड?

पुनश्च    अनिल अवचट    2019-01-05 06:00:46   

मूल्यव्यवस्था हा आपल्या सर्वांच्याच अत्यंत आवडीचा शब्द आहे. जगण्यासाठी स्वतःची अशी काही काही मूल्ये असलेली आणि ती प्राणपणाने जपणारी व्यक्ती नेहमीच आदराचा विषय ठरते. अशा वेळी मूल्य आणि मूल्यव्यवस्था ही सतत बदलती असते, हे वाक्य आपल्या पचनी पडत नाही,परंतु तेच वास्तव आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, मी एखाद्या गोष्टीविषयी दोन भिन्न काळात दोन वेगळी मतं व्यक्त केली असतील तर त्यातलं नंतरचं मत ग्राह्य धरा, कारण मतं बदलत नसतील तर तुमची वैचारिक वाढ थांबली आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच अनुषंगानं मूल्ये आणि बंडखोरी यावर भाष्य  करणारा  अनिल अवचट यांचा हा १९७० साली प्रसिद्ध झालेला लेख. अवचट किती विविधांगी लिहितात हे गेल्या पन्नास वर्षात आपण पाहिलंच. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी त्यांना असलेली समज किती विलक्षण होती, त्यांची भाषा किती संपन्न होती याचा अनुभवही हा लेख वाचताना येतो- ********** अंक -  दीपावली, जानेवारी १९७०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , दीपावली , समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Harihar sarang

      4 वर्षांपूर्वी

    चळवळींसाठी मार्गदर्शक असे विचार। समाजात असलेल्या असंतोषाला वळण देण्यासाठी आणि नवीन मूल्यव्यवस्थेच्या प्रस्थापणेसाठी आवश्यक असणारा अवकाश पुरविण्यासाठी एका बंडखोर तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे। प्रचलित तत्त्वज्ञानाची व्यवस्था ही प्रस्थापितांच्या हितसंबंधांचे संरक्षण मात्र करते।

  2. Vinesh Salvi

      4 वर्षांपूर्वी

    ?????

  3. Pandharipande Vijay

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय विचारपूर्वक लिहिले आहे,मुद्देसूद.

  4. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    किती मौलिक विचार सुसूत्रपणे मांडले आहेत. तेसुध्धा वयाच्या पंचविशीत ????

  5. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    अनिल awachat यांच्या लेखातुन समजाचे अतिशय परखड वास्तव समोर येते. खंत याची आहे की आजही ही परिस्थिती बदलू शकली नाही.

  6. subkem

      6 वर्षांपूर्वी

    >>मार्क्सने सांगितले होते की जास्त औद्योगिकरण झालेल्या देशात (उदा. जर्मनीत) प्रथम क्रांती होईल पण लेनिनने ती क्रांती रशियासारख्या अर्ध-औद्योगिकरण झालेल्या देशात घडविली व माओने तर शेतीप्रधान अशा चीनमध्ये घडवून आणली.<< सत्तरच्या दशकात प्रचलित असलेले राजकीय गैरसमज. अवचटांचा हा लेख युनिकोडात ह्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यामुळे अनेक अभ्यासकांना मदत होईल. धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts