ट्रिंग ट्रिंग टेलिफोन

पुनश्च    श्रीराम हळबे    2019-04-27 06:00:55   

विनोद समजणे आणि समजून घेणे हे इतर कोणताही साहित्यप्रकार समजून घेण्यापेक्षा अवघड असते कारण संदर्भ माहिती असल्याशिवाय विनोद कळत नाही. समाज बदलतो, परिस्थिती बदलते तेव्हा अनेकदा  त्या विनोदात   'काय  विनोद आहे' असा प्रश्न पडू शकतो. टेलिफोन म्हणजे आजच्या भाषेत लँडलाईन फोन, घरी येणे हा जेव्हा कपिलाषष्टीचा योग समजला जायचा त्या काळी या विषयावर अमाप विनोदी लेखन झाले. आजचा लेख हा त्यातलाच एक फर्मास नमुना आहे. श्रीराम हळबे  यांनी हा लेख १९८०  लिहिला होता. तसा हा फार मागचा काळ नसला तरी आता त्याला चाळीस वर्षे होत आली आहेत...या चाळीस वर्षात फोनची कन्सेप्ट आणि फोनची उपलबद्धता यात किती क्रांती झाली याची कल्पनाही आपल्याला येईल.. ********** आपल्या घरी टेलिफोन नसतो, तेव्हा कधी कधी वाटते की टेलिफोन ही फार उपयुक्त गोष्ट आहे. १५ वर्षांपूर्वी असही वाटे की आपल्याकडे टेलिफोन असणं हे एक ‘प्रतिष्ठेचं’ प्रतीक आहे. निदान पोकळ श्रीमंतीचे! मला आठवते की, जवळजवळ १२/१३ वर्षांपूर्वी आमच्या घरी वाजतगाजत टेलिफोन आला. वाजतगाजत म्हणण्याचा उद्देश इतकाच की आजूबाजूच्या रहिवाशांच्या दृष्टीने, ज्याप्रमाणे मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी बहुतेक शेजारची बालगोपाल मंडळी करते त्याप्रमाणेच, आमच्या घरी टेलिफोनची ‘प्राणप्रतिष्ठा’ करण्यात आली. बहुतेक बिल्डिंगच दरवाजाजवळ जमली होती. छोट्या मंडळींना दिवाळी-दसऱ्याच्या सणाचीच आठवण होत होती. कोण काय बोलत आहे ते आवाजाच्या दिवाळीमुळे कुणालाच समजत नव्हते. अखेर तो सोहळा चहा-चिवडा घेऊन संपला. टेलिफोन व्यवस्थित चालला आहे की नाही याची खात्री पहिल्याच दिवशी पाच मिनिटांनी वरच्या मजल्यावरील ‘व्यकंटरामन्’ने केली. त्याचा गॅस गेला होता व सिलिंडर मागविण्यासाठी त्याने आमच्याकडू ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , किर्लोस्कर , पुनश्च , श्रीराम हळबे

प्रतिक्रिया

  1. rajulondhe@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान लिहिला आहे. ज्यांचा टेलिफोन नंबर केअर ऑफ म्हणून दिला जात असे ते घर डॉकटर, वकील यांच्या इतकेच विश्वसनीय असायचे कितीतरी calls वरील बोलणे हे कायम गुपितच ठेवले जायचे.

  2. ulhas

      6 वर्षांपूर्वी

    जनरल कोटा व ओ वाय टी कोटा असे दोन प्रकार होते. ओ वाय टी तून फोन घेणारा स्वतःला VIP समजत असे.

  3. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    मस्त, जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

  4. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    खरंच, त्या काळात घरी टेलिफोन असणे म्हणजे विकतचे दुखणे होते.......

  5. SubhashNaik

      6 वर्षांपूर्वी

    लेख रंजक व उद्बोधक आहे, कालबाह्य म्हणावे तर आजही मोबाईलवर बोलणाऱ्यांची विषय तेच आहेत. मोबाईलने आख्ख्या पिढीला वेड लागले आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts