महात्मा गांधी १९१५ च्या जानेवारीत हिंदुस्थानांत आले, तेव्हां भारताच्या राजकारणांत तीन विचारसरणी होत्या; एक प्रागतिकांची सनदशीर राजकारणाची, दुसरी जहालांची अडवणुकीच्या बहिष्कारवादाची आणि तिसरी ज्वलजहालांची सशस्त्र दहशतवादाची. या तीनही विचारसरणी यावेळी आपापल्या परीने राजकीय प्रगति साधण्यांत अपेशी झाल्या होत्या. दहशतवादी चळवळ तर जवळ जवळ नाहींशीच झाली होती. महाराष्ट्रानें त्यांत मोठा भाग उचलला होता. आणि बाकीच्या दोन्ही विचारप्रवाहांचें नेतृत्वही महाराष्ट्राकडे होते, सुटून आल्यावर टिळकांनी आपल्या हालचालींना प्रारंभ केला होत्या. बिझांटबाईंची स्वराज्यसंघाची चळवळ सुरू झाली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
gorakh padar
11 महिन्यांपूर्वीराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व कृती कालातीत असून त्यांच्या जीवनातील प्रसंग हृदयाला भिडणारे आहे आपण ते उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
saurabh photography
2 वर्षांपूर्वीखूप आवडले. असे अजून सकस, जुने अन् चांगले साहित्य वाचायला आवडेल.