ये तेरा घर ये मेरा घर...असे गाणे पक्षांना, प्राण्यांना, कृमी किटकांना गुणगुणता येत नाही. त्यांच्या त्यांच्या भाषेत कदाचित ते गुणगुणत असतीलही परंतु आपल्याला ते कळत नाही. मात्र स्वतःचे घर असण्याची आस मनुष्याप्रमाणेच त्यांनाही असते. फरक एवढाच की मनुष्यमात्रांची घरे आवड,सवड, पैसा, प्रतिष्ठा या नुसार वेगवेगळी असतात. एका जातीचे पक्षी-प्राणी मात्र आपली घरेही एकाच पद्धतीने बांधतात. तरीही प्राणी-पक्षी यांच्यात जसे विस्मयचकीत करणारे वैविध्य आहे, तसेच वैविध्य त्यांच्या घरांमध्ये, घर बांधण्याच्या पद्धतींमध्येही आहे. या वैविध्याचा अतिशय रोचक आणि रसाळ असा हा वृत्तांत. श्रावण या मासिकाच्या सप्टेंबर १९९९ मधील अंकातून हा लेख घेतलेला आहे. ********** अंक – श्रावण, सप्टेंबर १९९९ समशीतोष्ण हवामानात राहणाऱ्या प्राण्यांना निवाऱ्याची फारशी गरज नसते. त्याचप्रमाणे हत्ती, गवा, गेंड्यांसारखे शक्तिमान प्राणी उघड्यावरच संसार थाटतात. इतर अनेक प्राणिमात्रांना रहाण्यासाठी तात्पुरते अथवा कायमचे निवास-स्थान लागते. मानवाची गोष्ट निराळी! तो गवंडी, सुतार, प्लंबर अशा कारागिरांकडून आपल्याला पाहिजे तसे घर बनवून घेऊ शकतो. प्राण्यांना मात्र स्वतःचे घर बनविण्यासाठी गवंडीकाम, सुतारकाम, शिवणकाम, भरतकाम इतकेच काय तर प्रसंगी खोदकामसुद्धा करावे लागते. ठराविक तऱ्हेचा बांधकाम व्यवसायही एखाद्या जातीच्या प्राण्यांची मक्तेदारी नसते. आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार, भोवतालच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या सामुग्रीचा विचार करुन प्राणी आपले घर बनवितात. जमिनीतील बीळ अथवा झाडाची ढोली म्हणजे सर्वात साधे घर! फांदी तुटल्यानंतर वृक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
श्रावण
, ज्ञानरंजन
, बालसाहित्य
, पर्यावरण
Makarand_Joshi
6 वर्षांपूर्वीया लेखातील बहुसंख्य उदाहरणे परदेशी पशु पक्ष्यांची आहेत. भारतीय पशु पक्ष्यांमधेही घर,घरटे,निवारा बनवण्याच्या कौशल्याची अनेक ऊदाहरणे आहेत. कावळ्याच्या घरट्यातील विविधवस्तु संग्रहापासून ते सनबर्डच्या लटकत्या ,कचऱ्याचा गोळा वाटणाऱ्या घरट्यापर्यंत भारतातही अनेक अजब गजब घरे निसर्गात पाहियला मिळतात
Makarand_Joshi
6 वर्षांपूर्वीया लेखातील बाया / सुगरण पक्ष्यांबाबत डॉ.सलिम अलींचे संशोधन वेगळे आहे. त्यानुसार घरटे विणण्याची कला बायामधील नरांना उपजत असते. ती शिकवावी लागत नाही वा शिकवली जात नाही. जर एखाद्या नर पक्ष्यामधे हे कौशल्य नसेल वा कमी दर्जाचे असेल तर त्याला जोडीदार मिळत नाही आणि त्याचे डिफेक्टिव जीन्स पुढे जात नाहीत. त्यामुळे इनक्युबेटर मधे उबवलेल्या अंड्यातील नरांनाही हाच नियम लागू होतो
gondyaaalare
6 वर्षांपूर्वीएकदम नावीन्यपूर्ण व सुरस माहितीने भरलेला लेख .