महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर ...? या शक्यतेमध्ये एक संकटही दडलेले असते. कर्ज रक्कम जेवढी मोठी तेवढे हे संभाव्य संकट ही मोठे असते. अशा अनेक प्रसंगांत आपले मन सांगते की ”जामीन राहायला पाहिजे” पण बुद्धी सांगत असते ”नको राहूस जामीन” किंवा ”जरा सांभाळून ”! आणि मग या बाबतीत कधीकधी दोन टोकांच्या भूमिका घेणारी माणसे दिसतात. माझा सी. ए. चा व्यवसाय करताना व बँकेच्या संचालकपदी काम करताना मला अशा अनेक व्यक्ती माहीत झाल्या की ”आम्ही कोणासही, जामीन राहत नाही” हे त्यांचे जाहीर धोरण असते. तर याउलट अशा काही व्यक्ती बघितल्या की त्या ”येथे कोणाहीसाठी जामीन मिळतील” असा जणू जाहिरात फलकच लावून असतात. त्या कोणालाही, कशाहीसाठी बिनधास्त जामीन राहत असतात. पण ही झाली दोन अजब टोके! यातला योग्य व मध्यम मार्ग काय असा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीडोळ्यात अंजन
RaviTorne
7 वर्षांपूर्वीupaukta mahiti milalai ddhanywad Uday Karveji
प्रकाश हिर्लेकर
7 वर्षांपूर्वीएकदा एका सहकारयाला मद्यपाशातून बाहेर काढण्यासाठी मी व माझा मित्र जामीन राहिलो.ना त्याचा मद्यपाश् सुटला , ना आमचा जामीनपाश.
charushende
7 वर्षांपूर्वीअतिशय उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आहे. आभार.