व्यक्ती आणि संस्था परिचय या सदरातून आपण अशा व्यक्ती आणि संस्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या बद्दल पुरेशी माहिती फार कमी लोकांकडे आहे. व्यक्तिचित्रण खूप आढळते पण संस्थांबद्दल त्यामानाने ( विशेषतः आपल्या समाजात )कमी लिहिले जाते. या सदरात आपण अशा संस्थांची माहिती घेतो ज्या जगभरात एक मानदंड बनल्या आहेत पण त्यांचा निर्माता कोण आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. प्रसिद्धी पराङमुख असणे म्हणजे काय हे या व्यक्तींकडे बघून कळते. त्या संस्थेचा परिचय म्हणजेच त्या व्यक्तीचा परिचय इतकी एकरूपता ते आणि त्यांची संस्था यात असते. म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्यायचे असेल तर त्या संस्थेच्या कार्याचे पोस्टमार्टेम आवश्यक ठरते. जागतिक मानदंड मानलेल्या रीडर्स डायजेस्ट या संस्थेबद्दल माहिती आपण मागील लेखात घेतली. यावेळी अशाच एका संस्थेची माहिती आपण घेणार आहोत ती आहे ' नॅशनल जिऑग्रफिक'... ॲडमिरल पिअरची उत्तर ध्रुवाची मोहीम, बर्डचे अंटार्क्टिकावरील (दक्षिण ध्रुव) पदार्पण, बिबने सागराच्या तळापर्यंत केलेले अवगाहन, ‘एक्स्प्लोरर’ द्वारे मानवाने केलेला अंतरिक्षप्रवास,- इत्यादी, भू-सागर-आकाश संशोधनाच्या क्षेत्रातील मोहिमांचा गेल्या ८० वर्षांचा इतिहास ह्या मासिकाच्या पानापानातून नोंदला गेलेला आहे. स्वत:च्या घरात मजेत आरामखुर्चीवर पडल्यापडल्याच, जगाच्या कानाकोप-यातील विविध मानवसमूह आणि पशुपक्षी ह्यांच्यासंबंधीचे अश्रुतपूर्व आणि आश्चर्यजनक ज्ञान तुम्ही ह्या मासिकाची पाने चाळून संपादन करू शकता. बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरापासून तो विषुववृत्तावरील अरण्यांपर्यंत जगातील कोणत्याही भागाचे दर्शन ह्या मासिकाचे पाने चाळता चाळता तुम्हाला होऊ शकते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ज्ञानरंजन
, संस्था परिचय
, नवनीत
, पर्यावरण
, नियतकालिकांचा इतिहास
subodhjawadekar
7 वर्षांपूर्वीगुगल इनपुट टूल वापरून अभिप्राय देता येतो.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीगुगल इनपुट वापरता ना? त्याने करू शकता इथे type. मी केलं ना आत्ता.
VirenSule
7 वर्षांपूर्वीCan someone tell me how to type Marathi in this window? Or Should I send my Abhipray using gmail where I can type Marathi font?
harshadp
7 वर्षांपूर्वीएकाच महिन्याचे सर्व अंक जर एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा अशा रीतीने रचले ??? something wrong here.