त्या दिवशीचे तेथील व्याख्यान म्हणजे सर्व लोकांना एक नाविन्याचाच विषय होता. नगरभवनाचा दिवाणखाना श्रोतृसमूहाच्यायोगे अगदी चिकार भरलेला होता. मी केलेली सर्व तयारी त्या प्रसंगी मला पालथी घालावयाची होती! प्रचंड टाळयांच्या कडकडाटांत मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली. शॉच्या गुणवर्णनाचा स्त्रोत माझ्या मुखावाटें सारखा गोकाकच्या धबधब्यासारखा उफाळून वहात होता! मधूनच टाळ्यांचा कडकडाट होई आणि ‘हिअर हिअर!' असे उद्गार श्रोतृसमुहांतून ऐकू येत व त्यायोगे माझ्या अंगांत नवीनच वायूचा संचार होऊन, माझ्या वक्तृत्वशक्तीस आणखी जोर येत असे! शाँ स्वतः शेक्सपियरला अत्यंत निकृष्ट प्रतीचा नाटककार समजतो हे मला माहीत होतें. म्हणूनच की काय मी शेक्सपियरवर सारखें तोंडसुख घेत होतों! 'कुचेष्टेनें प्रतिष्ठा मिळते' ही म्हण माझ्या नीट परिचयाची म्हणूनच, मी शेक्सपियरवर सारखा कुचेष्टांचा भडिमार चालविला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .