या सर्व सत्याग्रहमोहिमांतून गांधींचा आत्मविश्वास, लोकप्रियता वाढत होती, तरी राजकीय क्षेत्रांतील पुढाऱ्यांचें लक्ष रूढ राजकीय चळवळींतच गुंतलेलें होतें. सरकारनें महायुद्धानंतर पूर्वीच्या आश्वासनांचा भंग केला, पुढाऱ्यांचा विरोध न जुमानतां रौलट अॅक्ट अंमलांत आणण्याचें ठरविले, मुसलमानांना खिलाफतीसंबंधी दिलेला शब्द पाळला नाहीं, त्यामुळे गांधींची साम्राज्यनिष्ठा नाहींशी होऊन त्यांनीं या अन्यायी राज्ययंत्राविरुद्ध सत्याग्रही बंड करण्याचे ठरविले व स्वराज्याची शिष्टाई करण्यासाठी इंग्लंडांत न जाता इथेच रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीला प्रागतिकांशिवाय सर्वांचा पाठिंबा मिळाला. टिळकांच्या गैरहजेरीत खाडिलकरांनी 'केसरी'त अनुकूल अग्रलेख लिहिले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
gorakh padar
9 महिन्यांपूर्वीराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईच्या सुरुवातीच्या काळातील विरोध, सहकार्य याविषयीचा छानसा लेख वाचायला मिळाला धन्यवाद