गांधीविरोधाच्या आघाडीला आणखी एक शक्ति याच कालांत येऊन मिळाली. आणि ती म्हणजे हिंदुत्ववादी राजकारणाची. खिलाफत प्रकरणीं या देशांत जी हिंदु-मुसलमानांची बळकट एकजूट सरकारच्या भेदनीतीच्या क्लृप्त्यांना न जुमानतां निर्माण झाली, तिच्या प्रतिक्रियेनें सरकारची भेदनीतीही बळावली. खिलाफतीचा निकाल कमालपाशानेंच लावल्यामुळे मुसलमानांचा इंग्रजांविरुद्ध उफाळलेला राग बोथट झाला आणि धूर्त सरकारनें भेदनीतीचा अवलंब करून पुन्हां तो हिंदूंविरुद्ध वळविला. असहकाराच्या चळवळी मागोमाग देशांत हिंदु-मुसलमानांचे दंगे भडकले. आणि पुढेही प्रत्येक असहकाराच्या चळवळीच्याबरोबर या दंग्यांचेंही दर्शन होऊं लागलें. १९२३ च्या या दंग्यांमुळे शुद्धीकरणाचा व हिंदूंची सामाजिक संघटना करण्याचा विचार हिंदूंत बळावला
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .