कामेच्छा ह्या गोष्टीचं स्वरूप जरी पेंडश्यांना आकलन झाले नसलें तरी पेंडश्यांच्या कादंबरींतील प्रत्येक नायकाला मूल होते. एकच मूल होते. आणि हे मूल होणे ही कादंबरींतील एक महत्त्वाची घटना असते. कथानकातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. पेंडश्यांच्या भावविश्वांत मूल होणे ह्या गोष्टीला एक विलक्षण महत्त्व आहे. ज्या एका बालवृत्तींतून पेंडश्यांच्या कलासृष्टीचा जन्म झाला आहे तिचें मूल म्हणजे एक प्रतीक तर नव्हे ? पण हा आपला एक तर्क झाला. आणि तोहि बहुधा चुकीचाच. मुलाच्या जन्माचें पेंडश्यांना एवढे महत्त्व कां वाटतें त्याविषयींचें माझें कुतूहल अजून पुरे झालेलें नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .